नवी दिल्ली : तुम्ही जर स्वतःसाठी किंवा मुलांसाठी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहे. वर तुम्हाला Lenovo आणि IKALL सारख्या ब्रँड्सचे शानदार मिळतील. या टॅबलेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: या टॅबलेटमध्ये ७ इंच स्क्रीन देण्यात आली असून, याचे रिझॉल्यूशन १०२०x६०० पिक्सल आहे. यामध्ये १.३ गीगाहर्ट्ज MediaTek MT८७६५ क्वाड-कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. टॅबलेटमध्ये रियरला २ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३५०० एमएएचची बॅटरी मिळेल. टॅबलेट Android ९ Pie वर काम करतो. यामध्ये वाय-फाय आणि ४जी LTE चा सपोर्ट मिळेल. म्हणजेच, यावरून तुम्ही फोन करू शकता. ३२ टक्के डिस्काउंटनंतर टॅबलेटला ९,१९४ रुपयात खरेदी करू शकता. ग्राहकांची ४,३०६ रुपयांची बचत होईल. या टॅबलेटमध्ये ७ इंच स्क्रीन देण्यात आली असून, याचे रिझॉल्यूशन १०२४x६०० पिक्सल आहे. यामध्ये १.३ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. या मेड इन इंडिया टॅबलेटमध्ये रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. टॅबलेट अँड्राइड ९ वर काम करतो. यामध्ये वाय-फाय आणि ४जी LTE चा सपोर्ट मिळेल. २१ टक्के डिस्काउंटनंतर टॅबलेटला ६,२९९ रुपयात खरेदी करता येईल. Lenovo Tab M7 लेनोवोच्या या टॅबलेटमध्ये ७ इंच स्क्रीन देण्यात आली असून, याचे रिझॉल्यूशन १०२४x६०० पिक्सल आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात १.३GHz MediaTek MT८३२१ क्वाड-कोर प्रोसेसरसोबत १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. टॅब अँड्राइड ९ पायवर काम करतो. यामध्ये रियरला २ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ३५०० एमएएचची बॅटरी मिळेल. यात वाय-फाय आणि ४G LTE सपोर्ट मिळतो. हा टॅबलेट Amazon वर २० टक्के डिस्काउंटनंतर ७,८९० रुपयात उपलब्ध आहे. या टॅबलेटमध्ये ९.६ इंच स्क्रीन देण्यात आली असून, याचे रिझॉल्यूशन १२८०x८०० पिक्सल आहे. टॅबलेटमध्ये १.३ गीगाहर्ट्ज एमटी६७३७ क्वाड कोर प्रोसेसरसोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सल कॅमेरा सेंसर मिळेल. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. ५० टक्के डिस्काउंटनंतर टॅबलेट ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टॅबलेटमध्ये ८ इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. यात १.३ गीगाहर्ट्ज क्वाड कोर चिपसेटसोबत २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेज मिळते. हे एक ३जी डिव्हाइस असून, यात ड्यूल-सिम सपोर्ट मिळेल. टॅबलेट अँड्राइड ६ वर काम करतो. १५ टक्के डिस्काउंटनंतर टॅबलेट ५,४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EnbV3s