नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आपल्या स्वस्त ४ जी स्मार्टफोन JioPhone Next ला दिवाळीत लाँच करणार आहे. याशिवाय, कंपनी आपला लवकरच बाजारात उतरवू शकते. जिओबुक म्हणून ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) च्या वेबसाइटवर दिसला आहे. यावरून भारतीय बाजारात याची लवकरच एन्ट्री होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्टिफिकेशन साइट वर जिओचे अपकमिंग लॅपटॉपचे तीन व्हेरियंट लिस्टेड सांगितले आहे. टिप्स्टर मुकुल शर्मा ने या लॅपटॉप्सला स्पॉट केले आहे. इंटरनल मॉडल्स चे नाव (NB1118QMW, NB1148QMW, and NB1112MM) च्या शिवाय, या लॅपटॉप्सची खूप सारी डिटेल्स समोर आली नाही आहे. जुन्या रिपोर्ट्स मध्ये दावा करण्यात आला होता की, लॅपटॉप 4G LTE कनेक्टिविटी, एक स्नॅपड्रैगन प्रोसेसर, 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज सोबत येवू शकतो. जिओ बुकच्या लाँचिंग तारखेची अद्याप माहिती समोर आली नाही. असे आहेत संभावित फीचर्स आधीच्या लीक वरून अपकमिंग जिओ लॅपटॉपमध्ये HD (1,366x768 पिक्सल) डिस्प्ले मिळू शकतो. यात स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर मिळू शकतो. जे स्नॅपड्रॅगन X12 4G मॉडेल जोडले आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी पर्यंत eMMC स्टोरेज मिळू शकते. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून एक मिनी HDMI कनेक्टर, डुअल-बँड WiFi आणि ब्लूटूथचा समावेश आहे. हे ३ अॅक्सिस एक्सलेरोमीटर आणि एक क्वॉलकॉम ऑडियो सोबत येवू शकतो. रिलायन्स जिओच्या या लॅपटॉपमध्ये कंपनीचे JioStore, JioMeet, आणि JioPages अॅप आधीच यात इंस्टॉल मिळतील. याशिवाय, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट एज आणि ऑफिस सारखे मायक्रोसॉफ्ट अॅप सुद्धा प्री - इंस्टॉल मिळतील. कंपनी याला कोणत्या किंमतीत लाँच करणार यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C3KdXm