नवी दिल्लीः फोल्डेबल फोनची क्रेझ हळू हळू वाढत आहे. कंपन्या आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्सला लाँच करण्याची तयारी करीत आहे. आतापर्यंत सॅमसंग आणि हुवावे शिवाय, अनेक दुसऱ्या कंपन्यांच्या फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केलेले आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणाऱ्या कंपनीमध्ये आता गुगल सुद्धा येत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगलचा फोल्डेबल स्मार्टफोन पुढील वर्षी लाँच केला जावू शकतो. पिक्सल ६ सीरीजचा प्रायमरी कॅमेरा मिळणार नाही फोनच्या लाँचिंग डेट संबंधी कंपनीने अजून कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु, या दरम्यान एका रिपोर्टमध्ये कंपनीच्या या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोन संबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 9to5Google च्या माहितीनुसार, गुगलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रो मध्ये ऑफर केला जाणारा कॅमेरा ऑफर केला जाणार नाही. कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये पिक्सल ५ चा कॅमेरा गुगल पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रो फ्लॅगशीप स्मार्टफोन Tensor चिपसेट सोबत येतो. यात मिळणाऱ्या कॅमेरा सेटअप आधीच्या डिव्हाइसच्या तुलनेत खूपच शानदार आहे. रिपोर्टमध्ये गुगल कॅमेरा APK फाइल्सचा उल्लेख करीत म्हटले की, फोल्डेबल पिक्सल स्मार्टफोनचे कोडनेम 'Pipit' आहे. यात आधी गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या पिक्सल ५ चा कॅमेरा सेन्सर दिला आहे. हा कॅमेरा १२.२ मेगापिक्सलचा (सोनी IMX363 सेंसर) चा आहे. याआधी पिक्सल ३ मध्ये पाहिले गेले आहे. फ्रंट मध्ये मिळू शकतो पिक्सल ६ चा सेल्फी कॅमेरा प्रायमरी कॅमेरा शिवाय, फोनमध्ये एक अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर सुद्धा ऑफर केला जावू शकतो. हे सेन्सर फोनच्या फोल्ड झाल्यानंतर वापरले जावू शकते. याशिवाय, या अपकमिंग फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा इनर आणि आउटर कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी कंपनीच्या या फोनमध्ये पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रोचा फ्रंट कॅमेरा ऑफर करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ES1wMm