नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea (Vi) आणि कडे अनेक शानदार रिचार्ज प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये यूजर्सला मोफत कॉलिंग, एमएमएस बेनिफिट्ससह अतिरिक्त डेटा मिळतो. कंपनीकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान देखील आहे. कडे २९९ रुपयांचा प्लान असून, हा प्लान आणि जिओच्या प्लानपेक्षा अधिक शानदार आहे. वाचा: Vodafone-Idea चा २९९ रुपयांचा प्लान वीआयचा २९९ रुपयांचा प्लान एअरटेल आणि जिओच्या याच किंमतीत येणाऱ्या प्लानपेक्षा दुप्पट डेटा ऑफर करतो. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज ४ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच, प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि बिंग ऑल नाइटची सुविधा मिळते. Binge All Night अंतर्गत ग्राहक रात्री १२ ते सकाळी ६ वाजल्यापासून अनलिमिटेड हाय-स्पीड डेटा वापरू शकतील. तसेच, मूव्हीज आणि टीव्हीचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. एअरटेल आणि जिओकडे देखील शानदार प्लान्स आहेत. एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, रिलायन्स जिओकडे ३४९ रुपयांचा प्लान असून, यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि JIO अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BPO61M