Full Width(True/False)

स्मार्टफोनचा होऊ शकतो स्फोट, फास्ट चार्जर वापरताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे आज अनेक कामे सोपी झाली आहेत. बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंगपासून ते तिकीट बुकिंगपर्यंत अनेक कामे याद्वारे शक्य होतात. स्मार्टफोनचा वापर आपण दिवसभर करत असल्याने देखील लवकर समाप्त होते. यावर पर्याय म्हणून कंपन्यांनी सपोर्टसह येणाऱ्या जास्त क्षमतेची बॅटरी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, फास्ट चार्जिंगमुळे फोनच्या बॅटरीला तर नुकसान पोहचत नाही? फास्ट चार्जिंग काय आहे व तुम्ही कशी काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊया. वाचा: फोनला फास्ट चार्ज कसे कराल? लक्षात घ्या की सर्व चार्जर हे फास्ट चार्जर नसतात व सर्व फोन हे फास्ट चार्जिंग सपोर्ट करत नाहीत. फास्ट चार्जिंगसाठी चार्जर आणि फोन दोन्ही फास्ट चार्जिंग सपोर्ट असणे आवश्यक आहे. तुमचा चार्जर फास्ट चार्जिंग सपोर्ट करत नसल्यास फोन नेहमीच्या चार्जरप्रमाणेच चार्ज होईल. तसेच, फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट नसल्यास कोणत्याही चार्जरने चार्जिंग केल्यास काहीही बदल होणार नाही. त्यामुळे चार्जर व फोन दोन्हीमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असणे गरजेचे आहे. तुम्ही फोनला फास्ट चार्जिंग फंक्शनसह येणाऱ्या पॉवर बँकने चार्ज करू शकता. फास्ट चार्जिंगने होते फोनच्या बॅटरीचे नुकसान? जर तुमचा फोन आणि चार्जर दोन्हीही फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत असल्यास यामुळे बॅटरीला नुकसान होत नाही. मात्र, चार्जर अथवा फोनपैकी एक जरी फास्ट चार्जिंग सपोर्ट करत नसल्यास यामुळे बॅटरीवर दबाव पडतो व फोन धमाक्याने फुटू शकतो. यामुळे फास्ट चार्जरचा वापर करण्यासाठी फोन सपोर्ट करतो की नाही याची माहिती घ्यावी. फास्ट चार्जिंग कशी होते? फास्ट चार्जिंगसह येणारे चार्जर केबलद्वारे जास्त पॉवर सप्लाय करतात. जj १२ वॉटचा चार्जर फोनला चार्ज करण्यासाठी २ तास लावत असल्यास, १८ वॉट चार्जरने हे काम १.५ तासात होईल. चार्जिंग कमी असल्यास चार्जर बॅटरीला अतिरिक्त पॉवर सप्लाय करतो. फोनची बॅटरी खराब होऊ नये यासाठी चार्जिंग वाढत जाताना चार्जर पॉवर सप्लायचा स्पीड कमी करतो. फास्ट चार्जिंग पूर्णपणे समाप्त झालेल्या बॅटरीला कमी वेळात लवकर चार्ज करण्यासाठी उपयोगी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bqyxTr