Full Width(True/False)

Nokia Tab T20 आज होणार भारतात लाँच, पाहा काय असेल यात खास

नवी दिल्ली: HMD Global आज भारतात टॅबलेट लाँच करणार आहे. नोकियाचा हा पहिला टॅबलेट Tab 20 असेल. तसेच, हा एक बजेट फ्रेंडली टॅबलेट असेल. हे डिव्हाइस फ्लिपकार्टवरून विकले जाईल. Unisoc T610 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि मजबूत बॅटरी नोकिया टॅबलेटमध्ये मिळू शकते. पाहा डिटेल्स. वाचा: संभाव्य तपशील: Nokia T20 टॅबलेटमध्ये १०.४ -इंचाचा २ K डिस्प्ले असेल. यामध्ये ८२०० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. टॅब १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोटोग्राफीसाठी Nokia Tab T20 मध्ये ८MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा फ्रंट कॅमेरा ५ MP चा असेल. टॅब बॉक्सच्या बाहेर Android ११ वर काम करेल. Nokia Tab T 20 मध्ये दोन वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट दिले जाईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर, Nokia T20 मध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, USB Type-C आणि ३.५ mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. Nokia Tab T20 ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज पर्यायासह ऑफर केला जाऊ शकतो. तसेच, टॅबचे स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने ५१२ GB पर्यंत वाढवता येते. डिव्हाईस सिंगल डीप ओशन कलर ऑप्शनमध्ये येईल. Nokia T20 ची अपेक्षित किंमत : Nokia T20 टॅबलेटच्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत EUR १९९ (अंदाजे रु.१७,२०० ) तर, Wi-Fi + 4G मॉडेलची किंमत EUR २३९ (अंदाजे रु. २०,६०० ) आहे. नोकिया T20 टॅबलेटची भारतात किंमत २०,००० रुपये असू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31leKTy