नवी दिल्लीः शाओमी () ने मुलांसाठी एक खास स्मार्टवॉच आणली आहे. शाओमीच्या या स्मार्टवॉचचे नाव Mi रॅबिट चिल्ड्रेन लर्निंग वॉच 5 प्रो आहे. आधीच्या मॉडल्सच्या तुलनेत ही स्मार्टवॉच खास फीचर्स सोबत आणली आहे. शाओमीच्या या स्मार्टवॉच मध्ये २ कॅमेरे, NFC सपोर्ट आणि 3D फ्लोर पोजिशनिंग सारखे फीचर्स दिले आहे. Mi रॅबिट चिल्ड्रेन लर्निंग वॉच 5 प्रो मध्ये १.७८ इंचाची रेटिना स्क्रीन दिली आहे. याचे रिझॉल्यूशन 448X368 पिक्सल दिले आहे. हार्ट रेट मॉनिटरी सोबत आली स्मार्टवॉच Mi रॅबिट चिल्ड्रेन लर्निंग वॉच 5 प्रो चा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वॉटरड्रॉप नॉच सोबत हे स्क्वॉयर वॉच फेस मध्ये आणली आहे. शाओमीच्या या स्मार्टवॉच मध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबीचे स्टोरेज दिले आहे. स्मार्टवॉच हार्ट रेट मॉनिटरिंगला सपोर्ट करते. यात स्किपिंग रोप, रोलर स्केटिंग, आउटडोर रनिंग, आउटडोर सायकलिंग, वॉकिंग सारखे अनेक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. या स्मार्टवॉच मध्ये बिल्ट इन PPG हार्ट रेट सेंसर दिला आहे. जो लागोपाठ मूव्हमेंटला मॉनिटर करतो. हार्ट रेट जास्त असल्यास वॉर्निंग देतो. व्हिडिओ कॉल्ससाठी स्मार्टवॉच मध्ये १३ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा शाओमीच्या स्मार्टवॉच मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टवॉच मध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. व्हिडिओ कॉल्ससाठी स्मार्टवॉच मध्ये १३ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. शाओमीची या स्मार्टवॉचची किंमत १२९९ युआन म्हणजेच जवळपास १५ हजार १०० रुपये आहे. जर फंक्शन्सचा विचार केला तर या स्मार्टवॉचमध्ये Hand WeChat, वॉइस चॅट आणि व्हिडिओ कॉलिंगला सपोर्ट करते. याशिवाय, शाओमीची ही वॉच GPS आणि बेस स्टेशन सारख्या पोझिशनिंग सिस्टमला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k8axcn