नवी दिल्ली : हे जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इंस्टंट पैकी एक आहे. या अ‍ॅपमध्ये यूजर्ससाठी अनेक कामाचे फीचर्स मिळतात. असेच एक फीचर हे आहे. याच्याशी संबंधित एक कामाची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणाचेही स्टेट्स सहज डाउनलोड करू शकता. वाचा: व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेट्स फीचरच्या मदतीने यूजर्स आपल्या आवडीचे फोटो आणि व्हिडिओला स्टेट्स म्हणून ठेवू शकतात. हे स्टेट्स कॉन्टॅक्टमधील लोकांनाच दिसते व २४ तासांनंतर आपोआप गायब होते. तुम्ही इतरांचे स्टेट्स पाहू शकता, त्यावर रिप्लाय देऊ शकता. मात्र डाउनलोड करता येत नाही. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचा स्क्रीनशॉट काढून कोणालाही शेअर करू शकता. मात्र, स्टेट्स म्हणून व्हिडिओ ठेवलेला असताना डाउनलोड करता येत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकने तुम्ही हे व्हिडिओ डाउनलोड करू शकता. WhatsApp स्टेट्सवरील व्हिडिओ असे करा शेअर WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी अँड्राइड फोनमध्ये गुगल फाइल्स नावाचे अ‍ॅप डाउनलोड करा. iOS यूजर्स फाइल मॅनेजर अ‍ॅपचा वापर करू शकतात. गुगल फाइल्समध्ये डाव्या बाजूला वरती मेन्यू दिसेल. त्यावर क्लिक करून सेटिंग्समध्ये शो हिडन फाइल्स पर्यायावर क्लिक करा. आता डिव्हाइसच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. त्यानंतर इंटर्नल स्टोरेज या पर्यायावर क्लिक करून WhatsApp सिलेक्ट करा.WhatsApp मध्ये मीडिया व त्यानंतर स्टेट्स पर्याय निवडा. तुम्ही जे स्टेट्स पाहिले असतील, ते या फोल्डरमध्ये दिसतील. तुम्ही या फोटो/व्हिडिओला डाउनलोड करून कोणासोबतही शेअर करू शकता. अशाप्रकारे तुम्ही एक अ‍ॅप डाउनलोड करून कोणाचेही स्टेट्स डाउनलोड करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BYShbH