Full Width(True/False)

हे सर्व मी माझ्या हट्टासाठी केलं; स्वतःसाठी केलं...महेश मांजरेकरांनी केला खुलासा

चुकीच्या गोष्टींवर चिडतो मी स्वतःला त्रास करुन घेत नाही. मी जसा बाहेर आहे; तसाच मी ''मध्ये प्रतिक्रिया देतो. त्यात मी कुठेही अभिनय करत नाही. प्रेक्षकांचं मी प्रतिनिधित्व करतो. स्पर्धकांना वाटतं की, आपण आरडा-ओरडा केला, राडे केले; तरच आपण खेळात टिकून राहू आणि आपल्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल. नुसतं चर्चेचा विषय बनून खेळात टिकून राहता येईल; असं नसतं. त्यांना माहिती नाहीय की, बाहेर एपिसोड प्रक्षेपित होताना तो कसा होतोय? त्यामुळे मी त्यांना वेळोवेळी सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या प्रेक्षकाला त्यांचं वागणं बघून राग येईल; तसाच तो मलाही येतो. मी त्यांना माझी प्रतिक्रिया सांगतो. एखाद्या चुकीच्या गोष्टीवर चीड व्यक्त करणे हा माझा वैयक्तिक स्वभाव आहे. रोजचे एपिसोड बघून मी त्यातील पॉईंटर काढत असतो. त्यानुसार प्रत्येक शनिवारी त्यांना आरसा दाखवण्याचं काम करतो. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष कलाकार, स्पर्धकांचे घराबाहेर चाहते, मित्र, नातेवाईक असतात. त्यांचा घराबाहेर एक वेगळाच खेळ सुरु असतो. त्या नातेवाईकांनी माझ्यावर प्रतिक्रिया देऊ नये. मी जर चुकीचा असेन आणि मुद्दाम कोणाला बोलत असेन किंवा कोणाची मुद्दाम बाजू घेत असेन तर; ते प्रेक्षकांना दिसतं. माझ्या नावाने चाहते, नातेवाईक ट्रोलिंग करत असतात; त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो. काम एके काममला सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र राहायला आवडतं. परिस्थिती कोणतीही असो; मी स्वतःला गुंतवून ठेवतो. मी थांबलो की संपलो. त्यामुळे नुसतं थांबून राहाण्यापेक्षा काम करू. चित्रीकरण सुरू नसेल तर माझं लिखाण सुरू असतं आणि लिखाण संपल्यावर चित्रीकरण. हे चक्र असंच सुरु आहे आणि यापुढेही सुरू राहील. लॉकडाऊनपूर्वी 'पांघरूण' या सिनेमाचं काम मी पूर्ण केलं. लंडनमध्ये 'दे धक्का २'चं चित्रीकरण केलं. त्यांनतर लॉकडाउनच्या दिवसांत मी बरंच लिखाण केलं. हिंदी वेब सीरिज दिग्दर्शित केली. काहींमध्ये अभिनयसुद्धा केला. लॉकडाउन शिथिल झाल्यावर 'वरणभात लोणचं कोण नाय कोणचं' हा लेखक जयंत पवार यांच्या पुस्तकावर आधारित सिनेमा चित्रित केला. 'मृगतृष्णा' हा आणखी एक अनोखा सिनेमा चित्रित केला. दरम्यान माझं आगामी सिनेमांच्या लेखनावर काम सुरू होतं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'गोडसे', 'व्हाइट' या सिनेमांच्या संहितेवर काम केलं. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात आगामी 'अंतिम' सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण केलं. दरम्यान मला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. एकीकडे चित्रीकरण सुरु होतं आणि मी केमोथेरेमी घेत होतो. शस्त्रक्रिया होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी सिनेमावर काम करत होतो. हे सर्व मी माझ्या हट्टासाठी केलं; स्वतःसाठी केलं. 'बिग बॉस'चा प्रोमो चित्रित झाला; तेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या. इतकंच नाही तर शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रीकरण पूर्ण करायचं इतकंच मला माहीत होतं. मला ज्या वेदना, जो त्रास होत होता त्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती. माझ्यासाठी माझं काम जास्त महत्त्वाचं आहे. आपण गोष्टींचा बाऊ करतोजो व्यक्ती या जगात आला आहे; तो कधी ना कधी एक्झिट घेणार आहे. कोणी अमर नाही. त्यामुळे जो वेळ हातात आहे; तो आपण सत्कारणी लावायला हवा. दरम्यानच्या दिवसांत काही टेस्ट झाल्या. त्या टेस्टचे रिपोर्ट येण्यापूर्वी मला अंदाज आला होता की, मला कर्करोग असणार आहे. पण, आपण आपल्या गोष्टींचा कितपत बाऊ करायचा? 'मलाच का?' असा विचार मी कधीच केला नाही. जसं इतरांना होतो; तसा तो मलाही झाला. त्यावर उपचार घेतले आणि आज मी त्यातून पूर्ण बरा झालो आहे. कदाचित माझ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच आणि अजून बरंच काम करायचं आहे या विचाराने मी लवकर बरा होत असेन. 'त्या' गोष्टी सांगणं महत्त्वाचंइतिहासातील अनेक गोष्टी, व्यक्तिमत्त्व प्रकाशात यायला हवी, त्यांची चर्चा व्हायला हवी. पण तितकं ते दुर्दैवानं झालं नाही. प्रत्येक गोष्ट, घटना, व्यक्तिरेखा महत्त्वाची असते आणि ती गोष्ट मला सिनेमातून मांडायची आहे. का? तर मला 'सिनेमा' बनवता येतो. माझं गोष्टी सांगण्याचं माध्यम सिनेमा आहे. 'गोडसे' सिनेमा जाहीर केल्यावर गांधीवादी मंडळींनी त्याचा बाऊ केला. त्यांनी स्वतःचा समज करुन घेतला की, मी महात्मा गांधींच्या विरोधाचा सूर सिनेमात दाखवेन. मला गांधींना वाईट दाखवायचंच नाहीय. मी त्यांना कसा काय वाईट ठरवू शकतो? आज स्वतःला गांधीवादी म्हणणारे लोक हिंसेचा मार्ग अवलंबतात. तेव्हा ते गांधींची शिकवण विसरतात. यापूर्वीही पु.लं.देशपांडे यांच्या सिनेमावर काहींनी टीका केली. तुम्हाला आवडला नाही तर बघू नका. पण, असा असा सिनेमा बनवायला हवा होता; असं कोणी मला सांगू नये. 'स्वातंत्र्यवीर सावकर' यांची गोष्ट आजच्या पिढीसमोर येणं महत्त्वाचं आहे. त्यांचं कर्तृत्व इंग्रजांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे नजरेआड करता येणार नाही. ती नजरेआड राहिलेली गोष्ट मला माझ्या सिनेमात मांडायची आहे. त्यातही राजकीय मंडळींना ठाऊक असायला हवं की, संविधानानं जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. आमच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं राजकीय नेत्यांचं काम आहे. पण, तेच या विरोधात ट्वीट करत असतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EGRKN2