Full Width(True/False)

BSNL ची Jio ला जोरदार टक्कर, ‘या’ स्वस्त प्लानमध्ये मिळत आहे ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधा

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी ला स्वस्त प्लान्ससाठी ओळखले जाते. कंपनीचा असाच एक प्लान आहे, जो , आणि सारख्या कंपन्यांच्या प्लान्सपेक्षा शानदार आहे. कंपनीने ग्राहकांसाठी ४२९ रुपयांचा प्लान आणला असून, याची वैधता ८१ दिवस आहे. म्हणजे ग्राहकांना सरासरी महिन्याला १५० रुपये द्यावे लागतील. वाचा: BSNL च्या ४२९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. सोबतच, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधा मिळते. दरमहिन्याचा खर्च बघितला तर ३ महिन्यांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये महिन्याला १५० रुपये खर्च येतो. BSNL चा ४२९ रुपयांचा बीएसएनलच्या ४२९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता जवळपास ८१ रुपये आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. म्हणजे प्लानमध्ये एकूण ८१ जीबी डेटा दिला जात आहे. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड ४० केबीपीएस पर्यंत कमी होईल. तसेच, यात अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, मोफत एसएमएसची देखील सुविधा देत आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे देखील सबस्क्रिप्शन मिळते. ग्राहकांना Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याचा वापर केवळ मोबाइलवर करता येईल. याशिवाय दिल्ली आणि मुंबईसाठी ८१ दिवस मोफत रोमिंगची सुविधा मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CK4TUY