Full Width(True/False)

जिओच्या स्वस्त रिचार्जमध्ये मिळत आहे बंपर डेटा आणि कॉलिंग, फेस्टिव्ह सीझन ऑफरचाही मिळेल फायदा

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स आणत असते. जिओकडे ९८ रुपयांपासून ते ३,४९९ रुपयांपर्यंतचे प्लान्स आहे. जिओकडे सध्या २५० रुपयांपेक्षाचे दोन रिचार्ज प्लान्स आहेत. या रिचार्ज प्लान्सपेक्षा २ रुपये जास्त देऊन ग्राहकांना दुप्पट डेटा मिळेल. हे प्लान्स कोणते आहेत व त्यात मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. वाचा: जिओचा २४७ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या फ्रीडम प्लान्समध्ये २४७ रुपयांचा प्लान येतो. ३० दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा ग्राहक एकाच वेळी देखील वापरू शकतात. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, आणि १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. याशिवाय अ‍ॅप्सचे देखील सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जिओचा २४९ रुपयांचा प्लान जिओच्या २४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, दररोज २ जीबी डेटा मिळेल. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. फेस्टिव्ह सीझन अंतर्गत प्लानमध्ये २० टक्के जिओमार्ट महा कॅशबॅक ऑफर देखील मिळेल. जिओच्या या प्लानमध्ये फक्त २ रुपयांचा फरक आहे. २४७ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळतो. तर दोन रुपये अतिरिक्त दिल्यास २४९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ जीबी डेटा मिळतो. वैधतेमध्ये देखील केवळ दोन दिवसांचा फरक आहे. २४७ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवस, तर २४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. मात्र, २४७ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारा २५ जीबी डेटा कधीही वापरू शकता. २० टक्के JioMart Maha कॅशबॅक ऑफर ग्राहकांना २४९ रुपयांच्या प्लानमध्ये २० टक्के ऑफरचा देखील फायदा मिळेल. त्यामुळे २४९ रुपयांचा प्लान नक्कीच फायद्याचा ठरतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pZAP4n