Full Width(True/False)

सैफ अली खानने केलं बॉलिवूडच्या गल्ली बॉयचं कौतुक; म्हणाला...

मुंबई: बंटी और बबली या चित्रपटाचा सिक्वल काहिच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आहे.हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे.यात ओरिजनल बंटीची भूमिका करत आहे.तर गल्ली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी विरुद्ध भूमिका करत आहे. हे दोघे या चित्रपटात चोराची भूमिका करणार आहे सैफ अली खान आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हटलं कि सिद्धांत हा खुप हरहुन्नरी कलाकार आहे.त्याचा कॅमेरा फेस एकदम निडर आहे. त्याच्याकडॆ बघून कधीच वाटले नाही की तो एक नवखा कलाकार आहे. पुढे सैफ म्हणाला सिद्धांत हा एक तरुण स्टार आहे यात कोणते दुमत नाही.परंतु बॉलीवूडला हा हरहुन्नरी कलाकार दिल्याबाबद्दल मी झोया अख्तरचे आभार मानतो कारण तिने गल्ली बॉयमध्ये सिद्धांत ला संधी दिली नसती तर चित्रपट सृष्टी एक चांगल्या कलाकाराला मुकली असती.तसेच आदीचे हे आभार कि त्याने बंटी और बबली २ साठी एक विनोदी कलाकार शोधून काढला.कारण विनोदी पात्र साकारणे सर्वात अवघड आहे. सिद्धांत हा ज्या पद्धतीने कोणते ही पात्र स्वीकारतो ते कैतुक करण्यासारखे आहे.तो एक मेहनती कलाकार आहे. तो त्याच्या मेहनतीमुळे आणि अभिनय कैशल्यामुळे चित्रपट सृष्टीतील सर्वात आकर्षक कलाकार ठरत आहे .यासोबतच सैफ ने सिद्धांतच्या भूमिकेसाठी त्याचे कैतुक केले आहे आणि त्याला दोन थम्स अप हि दिले आहे.बंटी और बबली २ या मसाला चित्रपटात सिद्धांत ने विनोदी पात्र साकारलं आहे आणि तो एक हरहुन्नरी कलाकार आहे. बंटी और बबली २ हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील दोन्ही मुख्य पात्रे चोराची दाखवली आहे. जी एकमेकांना छेद देताना दिसणार आहे.या चित्रपटात खूप वर्षांपासून दूर असलेली राणी मुखर्जी डेब्यू करणार आहे ती या चित्रपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.तसेच या चित्रपटातून डेब्यू करणारी शर्वरी हि सुध्दा एका आकर्षक भूमिकेत दिसणार आहे. बंटी और बबली २ या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा करत आहे त्यांनी आतापर्यत सुलतान आणि टायगर जिंदा है या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YiAyOA