मुंबई: हिंदीचं १५ वं पर्व सध्या सुरू आहे. पण गेल्याकाही पर्वांच्या तुलनेत या सीझनचा टीआरपी कमी असल्यानं निर्माते नव नवीन प्रयोग करून पाहत आहेत. जुन्या पर्वातील काही स्पर्धकांना पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री दिली जात आहे. या पैकीच एक नाव म्हणजे राखी सावंत. १४ व्यापर्वातही राखी सावंतला एन्ट्री दिल्यानंतर टीआरपी वाढला होता. या पर्वातही वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉसच्या घरात येणार आहे. फक्त राखी सावंतच नव्हे तर तिचा पती रितेश देखील बिग बॉसमध्ये येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात ती रितेशसोबत दिसतेय. पण त्याचा चेहरा अद्यापही समोर आला नाहीए. तसंच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीनं रितेशसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. माझ्या आणि रितेशमध्ये कितीही भांडणं झाली तरी; आम्ही एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाही असं, राखी म्हणतेय. माझं लग्न झालं आहे, असं सांगितल्यानंतर अनेकांनी हे खोटं असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता मी आणि रितेश बिग बॉसच्या घरात एकत्र येतोय. आता सर्वांना विश्वास बसेल. माझा नवरा जगासमोर येईल. इतकंच नाही तर रितेशसोबत चार पद्धतीनं लग्न केल्याचं राखीनं सांगितलं. माझ्या इच्छेनुसार ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. रितेशसाठी हिंदू प्रथेनुसार केलं. तसंच कायदेशीर पद्धतीनंही केलं. तसंच मी मनाचं त्याच्यासोबत लग्न झाल्याचं राखीनं एका मुलाखतीतल म्हटलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CUtXYH
