Full Width(True/False)

Instagram वरुन Twitter वर क्रॉस पोस्टिंग झाले सोपे, 'हे' खास फीचर आले परत

नवी दिल्ली : लिंक प्रिव्ह्यू परत आले आहे. या फीचरला कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. हे फीचर इंस्टाग्रामवरून ट्विटरवर सोपे करते. आता यूजर्सने ट्विटरवर इंस्टाग्राम लिंक शेअर केल्यास ट्विट पोस्टमध्ये प्रिव्ह्यू दिसेल. याआधी ट्विटरवर इंस्टाग्राम लिंक पोस्ट केल्यास केवळ लिंकचे यूआरएल दिसत असे. वाचा: हे अपडेट अँड्राइड, आयओएस आणि वेब अशा सर्व यूजर्ससाठी लागू झाले आहे. खास गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम ट्विटर कार्ड फीचरला ९ वर्षांनी परत आणले आहे. इंस्टाग्रामने ट्विटमध्ये फीचरबाबत माहिती देताना सांगितले की, आता ट्विटरवर इंस्टाग्राम लिंक शेअर केल्यास त्या पोस्टचा प्रीव्ह्यू दिसेल. या फीचरला कंपनीने काही वर्षांपूर्वी हटवले होते. त्यामुळे पोस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी यूजर्सला लिंकवर क्लिक करावे लागत असे. रिपोर्टनुसार, इंस्टाग्रामने २०१२ मध्ये मेटाने खरेदी केल्यानंतर ट्विटरवरील पोस्टच्या प्रीव्ह्यूला दाखवणे बंद केले होते. त्यावेळी इंस्टाग्रामचे संस्थापक आणि माजी सीईओ केविन सिस्ट्रॉम म्हणाले होते की, हा निर्णय त्यांचा नसून, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा आहे. याशिवाय ट्विटरने देखील एक महत्त्वाची सुविधा त्यावेळी बंद केली होती. यूजर्स ते इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या लोकांना ट्विटरवर शोधू शकत होते. मात्र ट्विटरने ही सेवा बंद केली होती. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BULG1I