नवी दिल्ली: तुम्ही iPhone वापरता का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: युजर्ससाठी. फोन पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. कधी कुणाच्या हातून पडतो आणि फोन पडल्यावर चुकून स्क्रीन तुटली, तर तो दुरुस्त करायचा असल्यास त्यावर मोठा खर्च करावा लागतो.. यामुळेच अनेक लोक 'क्विक फिक्स' किंवा 'जुगाड' करण्यास प्राधान्य देतात. पण, हे 'क्विक फिक्स' तुम्हाला मोठ्या संकटात आणू शकते. वाचा: iFixit अहवालात असे दिसून आले आहे की, जर तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन थर्ड-पार्टी रिपेअर शॉपने बदलली तर नवीन iPhone 13 त्याची फ्लॅगशिप फेस आयडी कार्यक्षमता पूर्णपणे अक्षम करते. FaceID iPhone च्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जे, स्क्रीन तुटल्यावर थर्ड पार्टी शॉपमधून स्क्रीन दुरुस्त करून घेतल्यास काम करणे बंद करते. किंमत किती? ने अद्याप iPhone 13 ची स्क्रीन बदलण्यासाठी किती खर्च येतो हे उघड केले नाही, परंतु iPhone 13 Pro Max साठी आउट-ऑफ-वारंटी स्क्रीन दुरुस्तीची किंमत यूएस किमतींमध्ये $३२९ (अंदाजे २५,००० रुपये) आहे. तर iPhone 13 Mini ची किंमत $२२९ (अंदाजे १७,०००रुपये ) आहे. भारतात, दुरुस्तीचा खर्च अमेरिकेपेक्षा जास्त आहे. iFixit ने iOS 15.1 वर स्क्रीन रिप्लेसमेंटची चाचणी केली असून अहवालात असे म्हटले आहे की, "iPhone 13 ची स्क्रीन समान ब्रँडच्या स्क्रीनने बदलल्यावर आयफोनला असा एरर येतो - या iPhone वर फेस आयडी सक्रिय करण्यात अक्षम आहे." Apple डिस्प्ले आणि फेसआयडी समस्येचे निराकरण कसे करते? अहवालात असे म्हटले आहे की, स्क्रीनच्या तळाशी एक छोटी चिप आहे. ही चिप इतर कोणत्याही थर्ड-पार्टी स्क्रीनवर काम करत नाही. अॅपलच्या अधिकृत सेवा प्रदात्यांकडे नवीन डिस्प्ले चिपसह सिंक करण्यासाठी अॅपलचे स्वतःचे सॉफ्टवेअर आहे. मात्र, त्यातही 'जुगाड' आहे, पण ते सोपे नाही. अहवालानुसार, जेव्हा अनधिकृत दुरुस्तीची दुकाने दुसरी स्क्रीन लावतात तेव्हा ते मूळ स्क्रीनची चिप काढून ती बदललेल्या स्क्रीनवर बसवू शकतात. पण ते धोकादायक आणि अवघड काम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZRkKTf