नवी दिल्ली : वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पेईने गेल्यावर्षी नावाने एक नवीन वेंचर सुरू केले होते. यावर्षी कंपनीने आपले पहिले प्रोडक्ट ला लाँच केले होते. भारतात फ्लिपकार्टवर इयर १ च्या पहिल्याच सेलमध्ये दोन मिनिटात सर्व यूनिट्सची विक्री झाली होती. कंपनीने पहिल्या सेलमध्ये इयर १ च्या जवळपास ५ हजार यूनिट्सची विक्री केली आहे. तसेच, कंपनी लवकरच आपले नवीन पॉवरबँक आणि २०२२ मध्ये नवीन फोनला लाँच करू शकते. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, कंपनी पाच नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे. वाचा: नथिंग इंडियाचे वॉइस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर मनु शर्मा यांच्यानुसार, कंपनी पाच नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे. नवीन ब्रँड असल्याने कंपनीकडे सध्या केवळ एक प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टला देखील पसंती मिळत आहे. कंपनी यावर्षाच्या अखेरीस कमीत कमी एक नवीन प्रॉडक्ट लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने नवीन उत्पादनांच्या लाँचसाठी कोणताही रोडमॅप शेअर केलेला नाही. अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की, भारत जागतिक स्तरावर इयर १ च्या विक्रीमधील सर्वात मोठा बाजार आहे व विश्वास न ठेवण्यासारखे कोणतेही कारण नाही. काउंटपॉइंटच्या आकडेवारीनुसार, एक नवीन ब्रँडने ७ टक्के बाजार हिस्सेदारीसह आपल्या पहिल्याच तिमाहीत प्रीमियम TWS सेगमेंटमध्ये टॉप थ्री ब्रँड्समध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, नथिंगने भारतात इयर १ च्या किंमतीत वाढ केली आहे. नथिंग इयर १ ला ५,९९९ रुपयात लाँच केले होते. मात्र १० नोव्हेंबरपासून ६,९९९ रुपयात विक्री केली जाणार आहे. कंपनीने कंपोनेंटचा वाढता खर्च व उत्पादन प्रक्रियेमुळे किंमत वाढवली आहे. मात्र, किंमतीत वाढ झाल्यानंतर देखील इतर बाजारांच्या तुलनेत भारतात याची किंमत कमी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kwq8mr