नवी दिल्ली : JioPhone Next भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला असून, कंपनीने याच्या किंमतीचा खुलासा आधीच केला आहे. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आल्यानंतर अनेकजण चा पर्यायी फोन देखील शोधत आहेत. या फोनची थेट टक्कर शी आहे. वाचा: रेडमीचा हा फोन जिओफोन नेक्स्टपेक्षा थोडा महाग आहे. या दोन्ही फोन्सच्या किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊया. दोन्ही फोन्सच्या किंमतीमध्ये अंतर पाहायला मिळतो. JioPhone Next price ची मूळ किंमत ६,४९९ रुपये आहे. तर 9A Sport ची किंमत ६,९९९ रुपयांपासून सुरू होते. किंमतीमध्ये ५०० रुपयांचा फरक आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर JioPhone Next मध्ये स्नॅपड्रॅगन २१५ चिपसेट दिला आहे. तर Redmi 9A Sport हा ऑक्टा कोर हीलियो जी२५ चिपसेटसह येतो. जिओचा फोन अँड्राइड ११ आधारित Pragati OS वर काम कतो. तर रेडमीच्या फोनमध्ये अँड्राइड ११ आधारित MIUI १२ ओएस दिले आहे. JioPhone Next मध्ये दुसऱ्या ऑपरेटरचे सिम देखील वापरू शकता. मात्र, यासोबत जिओ सिम देखील वापरावे लागेल. तुम्ही जिओच्या सिमनेच डेटा वापरू शकता. तर दुसरीकडे रेडमी ९ए मध्ये सर्व ४जी सिमला कोणत्याही अटीशिवाय वापरू शकता. स्क्रीनबद्दल सांगायचे तर JioPhone Next मध्ये ५.४ इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. तर Redmi 9A मध्ये ६.५ इंच HD+ LCD वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. जिओफोन नेक्स्टमध्ये ३५०० एमएएचची बॅटरी मिळते, तर रेडमीच्या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. JioPhone Next मध्ये १३ मेगापिक्सल रियर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. Redmi 9A Sport मध्ये १३ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mLBGDF