Full Width(True/False)

लाँचआधीच लीक झाला Poco M4 Pro 5G स्मार्टफोनचा फोटो, जबरदस्त डिझाइन

नवी दिल्लीः ९ नोव्हेंबरला ग्लोबली लाँच केला जाणार आहे. रिपोर्ट्सवरून उघड झाले की, चा रीब्रँडेड व्हर्जन असणार आहे. जो आधी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचिंग आधी व्हिएतनाम पब्लिकेशन ThePixel.vn ने ची पहिली झलक देण्यासाठी पहिला फोटो शेयर केला आहे. POCO M4 Pro 5G डिज़ाइन फोटोत पाहिले जावू शकते की, 5G ची डिझाइन चीनच्या Note 11 सारखी आहे. समोरच्या बाजुला यात एक पंच होल डिस्प्ले आहे. तसेच याच्या मागच्या साइडला एक ड्युअल कॅमेरा सिस्टम दिला आहे. POCO M3 Pro 5G प्रमाणे कॅमेरा यूनिटला एक रेक्टांगुलर मॉड्यूल मध्ये ठेवण्यात आले आहे. ज्यात उजव्या बाजुला मोठ्या आकाराचा पोको ब्रँडिंग आहे. POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशंस POCO M4 Pro 5G मध्ये ६.६ इंचाचा IPS LCD पॅनेल दिला आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट देते. फोनमध्ये डायमेंशन ८१० चिपसेट उपलब्ध आहे. रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, हा तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध होणार आहे. यात ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. याच्या फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, एक एलईडी फ्लॅश आणि एक AI लोगो दिला आहे. POCO M4 Pro 5G मध्ये 5,000mAh जे 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा MIUI 12.5 आधारित Android 11 सोबत प्रीइन्स्टॉल्ड येण्याची शक्यता आहे. सध्या एम प्रोच्या किंमतीसंबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GPwAOW