Full Width(True/False)

‘हे’ १० अँटीव्हायरस अ‍ॅप तुमच्या फोनला व्हायरसपासून ठेवतील लांब, डेटाही राहील सुरक्षित

नवी दिल्ली : स्मार्टफोन आपल्या दररोजच्या कामासाठीचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र, याद्वारे आर्थिक फसवणूक देखील होत आहे. सायबर गुन्हेगार फोनच्या माध्यमातून डेटा चोरी करण्यासोबतच बँक अकाउंट खाली करत आहे. फोनमध्ये व्हायरस अटॅकची मोठी समस्या असते. त्यामुळे फोनला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशाच १० अँड्राइड अँटीव्हायरस अॅपबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही फोनला सुरक्षित ठेवू शकता. वाचा: तुम्ही अँटीव्हायरस अ‍ॅपला प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ही एक पेड सर्व्हिस असून, याद्वारे तीन मोबाइल सुरक्षित राहतील. यामध्ये अ‍ॅडवाइजर, अँटी-थेफ्ट फीचर्स आणि कॉल ब्लॉकिंगची सुविधा मिळते. तुम्ही या अ‍ॅपला मोफत डाउनलोड करू शकता. मात्र, यावर वारंवार जाहिराती दिसतात. याद्वारे तुम्ही कितीही डिव्हाइसला सुरक्षित करू शकता. यात अँटी थेफ्ट, वाय-फाय सिक्योरिटी, जंक क्लिनर सारखे फीचर्स मिळतात. हे सर्वात लोकप्रिय मोफत पैकी एक आहे. एका अकाउंटवरून तुम्ही अनेक डिव्हाइस अ‍ॅक्सेस करू शकता. यामध्ये अँटी-थेफ्ट फीचर मिळते. मात्र, या अ‍ॅपमध्ये जाहिराती दिसतात. Kaspersky Internet Security Malware रोखण्यासाठी हे अ‍ॅप उत्तम आहे. यात देखील एका अकाउंटने तुम्ही अनेक फोन वापरू शकता. यामध्ये अँटी-थेफ्ट, अँड्राइड वीयर सपोर्ट मिळते. हे अ‍ॅप मोफत आहे. Trend Micro Mobile Security या अ‍ॅपमध्ये देखील अँटीव्हायरससह अनेक खास फीचर्स दिले आहेत. यात एका अकाउंटने केवळ एकच डिव्हाइस वापरू शकता. यामध्ये पे-गार्ड, सोशल नेटवर्क प्रायव्हसी आणि पॅरेंटल कंट्रोल सिस्टम सारखे फीचर्स आहेत. हे एक पेड अ‍ॅप आहे. फ्री अँटीव्हायरस कॅटेगरीमध्ये हे देखील चांगले अ‍ॅप आहे. याच्या एका अकाउंटवरून तुम्ही अनेक डिव्हाइस कनेक्ट करू शकता. यामध्ये अँटी-थेफ्ट आणि प्रायव्हसी चेकर सारखे खास फीचर आहेत. Sophos Intercept X for Mobile हे मोफत अ‍ॅप असून, यात जाहिराती देखील पॉप अप होत नाही. एका अकाउंटवरून तुम्ही अनेक मोबाइल सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये क्यूआर कोड स्कॅनर, ऑथेंटिकेटर आणि अँटी थेफ्ट फीचर्स मिळतात. AhnLab V3 Mobile Security या अ‍ॅपमध्ये देखील अनेक खास फीचर्स दिले आहेत. यामध्ये प्रायव्हसी एडवाइजर, परफॉर्मेंस बूस्टर दिले आहे. हे अ‍ॅप मोफत आहे. Avira AntiVirus Security हे मोफत अ‍ॅप असून, यामध्ये आयडेंटिटी सेफगार्ड, परमिशन मॅनेजर आणि अँटी-थेफ्ट सारखे फीचर्स मिळतात. Bitdefender Mobile Security हे पेड अ‍ॅप असून, यामध्ये अँटी-थेफ्ट आणि प्रायव्हसी एडवाइजची सुविधा मिळते. एक अकाउंट केवळ एकाच फोनमध्ये वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BH0fpE