नवी दिल्ली : Aadhaar कार्ड किती आवश्यक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. अशात जर एखाद्या व्यक्तीचे आधार हरविले तर साहजिकच ती व्यक्ती अस्वस्थ होते. नवीन कार्ड घेण्यासाठी आधार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण, नवीन आधार कार्ड बनवताना एक महत्वाचा क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर घरबसल्या सहज नवीन आधार कार्ड मिळू शकते. हा क्रमांक काय आहे आणि तो कसा काम करतो ते जाणून घ्या. वाचा: हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयडी) किंवा एनरोलमेंट आयडी (ईआयडी) आहे. तो २८ अंकी असतो. जो आधारसाठी नोंदणी करता तेव्हा तुम्हाला मिळतो. आधार नोंदणी केल्यानंतर, तुमचा आधार UID/EID नोट करुन ठेवा . याद्वारे तुम्ही तुमच्या आधार नोंदणीची स्थिती तपासू शकता. नुसार, आधार हरवल्यास नवीन कार्डसाठी आधार UID/EID द्वारे ऑनलाइन अर्ज देखील करता येतो. UID/EID द्वारे आधार कार्ड पुन्हा कसे मिळवायचे? आधार कार्डधारकाला त्याच्या चा क्रमांक आठवत नसेल तेव्हा कामी येतो. या नाव नोंदणी क्रमांकाद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड सहज बनवू शकता. EID चा वापर आधार स्टेटस तपासण्यासाठी आणि आधार डाउनलोड करण्यासाठी देखील केला जातो. ज्याद्वारे तुम्ही UIDAI वेबसाइटवरून पुन्हा आधार डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला १४ अंकी नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3H8JAhJ