मुंबई- अभिनेत्री ही आपल्या बेधडक वक्तव्यासाठी नेहमी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती अनेकदा देशातील घटनांवर आपले मत मांडत असते. यामुळे तिच्यावर अनेकदा टीका ही होते. परंतु ती या टीकेला न घाबरता आपली मते मांडतच असते. तिच्या या लढावू वृत्तीमुळे स्वरा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अशातच ती पुन्हा चर्चेत आली असून ज्यात तिने आपल्या सिंगल मदर असण्या संदर्भात भाष्य केलं आहे. स्वरा म्हणाली की, मी अशा व्यक्ती सोबत कधीच लग्न करू शकत नाही ज्याच्यावर माझे प्रेमच नाही. फक्त मुलं हवी आहेत म्हणून लग्न करायला हवे या गोष्टीवर माझा विश्वास नाही. कारण सिंगल मदर किंवा सिंगल फादरही मुलांची योग्य काळजी घेऊ शकतात, असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु ज्या लोकांना असं वाटतं की मुलांच्या योग्य भविष्यासाठी आई- वडील या दोन्ही पालकांची गरज असते त्या लोकांच्या मतावर माझा विश्वास नाहीत. कारण मला वाटतं की मुलाच्या चांगल्या विकासासाठी नेहमी दोन्ही पालकांची गरजच असते असं नाही. स्वरा पुढे म्हणाली की, 'दोन पालक तेव्हाच आदर्श असतात जेव्हा ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांच्या इच्छेने राहतात. अशी अनेक मुले आहेत जी की विभक्त कुटुंबात वाढतात. म्हणूनच माझं स्पष्ट मत आहे की, एकटं पालक होणं आणि मुलाला निरोगी वातावरणात वाढवणं चांगलं आहे. कारण आपल्या समाजात अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी एकटं राहण्याला पसंती दिली आणि त्यांनी मुलं दत्तक घेतली. भगवान कृष्ण हे त्याचंच उत्तम उदाहण आहे, ज्यांचं पालनपोषण यशोदेनं केलं. पण तिने त्याला जन्म दिला नव्हता.' 'दत्तक मुल घेण्याची आपली भारतीय परंपरा मोठी राहिली आहे .याची अनेक ताजी उदाहरणं आपल्या समोर आहेतच शिवाय काही पौराणिक आणि ऐतिहासिक उदाहरणंही आहेत. आई- वडील मुलांवर प्रेम करतात, त्यांच्या विकासाची जबाबदारी घेतात हे चांगलंच आहे. विशेषतः भारतात, मजबूत कौटुंबिक प्रणाली आहे. ज्यामुळे मुलं त्यांच्या आजी-आजोबा, काका-काकू आणि इतर अनेक नातेवाईक आणि मित्रांसोबत वाढतात.' दरम्यान, स्वराने मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पुढील एका वर्षात ही प्रक्रिया पूर्ण होऊन ती एका बाळाची आई होईल. स्वरा एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती की मी एक मुल दत्तक घ्यावं. मी खूप आनंदी आहे की, माझी ही इच्छा आपल्याच देशात पूर्ण होत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32oeV1e