मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की ज्यांचा करिष्मा आजही कायम आहे. किशोर कुमार, लता मंगेशकर यांचा जादुई आवाज, वयाच्या ८० व्या वर्षी उत्साहाने काम करणारे अमिताभ बच्चन आणि चिरतरुण अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल कपूर. या सगळ्यांचं कामच सर्व काही बोलून जातं. काल यांनी त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. वय हे त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे, हा अभिनेता एव्हरग्रीन आहे. वाढदिवसा निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्यात सर्वात हटके शुभेच्छा पुतणा ने दिल्या. अर्जुनने अशा दिल्या काकाला शुभेच्छा अर्जुनने काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोत अनिल यांचा तरुणपणातला फोटो टाकला आहे. हे कमी की काय अर्जुनने स्वतः तो म्हातारपणी कसा दिसेल याचाही फोटो शेअर केला. पण याही फोटोत अनिल कपूर यांना एव्हरग्रीनच दाखवण्यात आलं आहे. गंमत म्हणजे चारही फोटोंमध्ये अर्जुन वयाने मोठा होत गेला पण अनिल मात्र तसेच चिरतरूण राहिले. अर्जुनने त्याच्या लाडक्या काकांचे फक्त फोटोच शेअर केले नाही तर त्यासोबत एक कवितादेखील शेअर केली. त्यामध्ये लिहिले की, 'तारुण्याचा खजिना, सळसळत्या तारुण्याचे उदाहरण, केवळ सदाबहारच नाही तर कायम राहणारे असं सौंदर्य कधीच पाहिलं नाही. दिवसागणिक ते तरुण होत आहेत, यात त्यांचा काय दोष. हे फक्त अनिल कपूरच करू शकतो. माझ्या लाडक्या काकाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.' इंडस्ट्रीमध्येही झाली ४० वर्षे! अनिल याचा जन्म २४ डिसेंबर १९५६ मध्ये झाला. त्यांनी १९७९ मध्ये सिनेसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून काम केलं. तर १९८३ मध्ये वो सात दिन या सिनेमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली. आज अनिल कपूर यांना सिनेविश्वात येऊन ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ybp4f