मुंबई- छोट्या पडद्यासोबतच चित्रपटांमध्ये आपल्या आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते यांनी नुकतंच त्यांचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. राम यांना मुंबईजवळ निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक घर हवं होतं. त्यासाठी राम यांनी अलिबागची निवड केली आहे. राम आणि त्यांची पत्नी गौतमी यांनी मिळून अलिबाग येथे एक बंगला खरेदी केला आहे. प्रत्येक आठवड्याच्या विकेंडला अलिबागच्या घरात जाऊन मजामस्ती करणार असल्याचं राम यांनी म्हटलं. करोनामुळे प्रत्येकजण घरात अडकून पडला होता. मात्र लॉकडाउन संपल्यावर अनेकांनी वेळ घालवण्यासाठी अलिबागची निवड केली. सध्या अलिबाग हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे. आपल्या स्वप्नामधील घर घेण्याबद्दल सांगताना राम म्हणाले, 'माझं गोवा आणि खंडाळ्याला आधीपासूनच घर आहे. त्यामुळे तिथे आणखी एक घर घेण्यात काहीच अर्थ नव्हता. पण २०१७ पासून मी अशाच एका जागेच्या शोधात होतो. जे माझ्या मुंबईतील घराचा एका भाग वाटेल. आणि आता अलिबागला जाणं खूप सोपं झालं आहे. त्यामुळे अलिबागमध्ये घर घेणं मला योग्य वाटलं. मला असं घर हवं होतं जिथे मी माझ्या कुटुंबासोबत अगदीच कमी वेळात जाऊ शकेन आणि माझ्या वीकेण्डचा आनंद घेऊ शकेन. गोवा आणि खंडाळा छान आहेत पण ते माझ्या घरापासून दूर आहेत. माझं स्वप्न होतं असं घर घेण्याचं जिथे माझी नातवंड देखील मजा करू शकतील.' पुढे राम म्हणाले, 'मागच्या दोन वर्षात अलिबाग खूप विकसित झालंय. चमचमीत जेवण, राहण्याची सोय, निसर्ग सगळंच छान आहे. माझं मुंबईजवळ घर घेण्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. आम्ही नवीन वर्षासाठी मालदीवला जाणार आहोक. पण त्यानंतर प्रत्येक आठवड्याला आम्ही इथेच येऊ.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xTp0yo