Full Width(True/False)

'लोकांनी पेट्रोल बँकेत गहाण ठेवायला सुरुवात केलीये म्हणे...', हेमंत ढोमेचा सरकारला टोला

मुंबई- मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक असलेला सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या मदतीने हेमंत अनेकदा समाजातील महत्वाच्या विषयांना वाचा फोडताना दिसतो. रस्त्यांवरील खड्डे असूदेत किंवा नाट्यगृहांवरील बंदी. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमंत अशा अनेक गोष्टींविरोधात आवाज उठवताना दिसतो. सध्या देशातील पेट्रोल आणि डिझेलचे वाढणारे दर हा कळीचा मुद्दा बनला आहे. हेमंतने याचं विषयावरून ट्विट करत सरकारला खोचक टोला लगावला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने दराची शंभरी कधीच पार केली होती मात्र आता डिझेलही शंभरच्या वर गेलं आहे. परंतु, सरकार मात्र या मुद्द्यांकडे डोळझाक करत असल्याचं चित्र आहे. सर्वसामान्य माणसाचा अंत पाहणाऱ्या सरकारच्या धोरणावर हेमंतने हल्लाबोल केला आहे. हेमंतने ट्विट करत लिहिलं, 'लवकरच पेट्रोल- डिझेल तारण कर्ज सुरू होणार, लोकांनी पेट्रोल बँकेत गहाण ठेवायला सुरूवात केलीये. तुम्ही पण या स्किमचा लाभ घ्या.' असं म्हणत हेमंतने सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हेमंतच हे ट्विट बरंच वायरल झालं आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत. देशात पेट्रोल- डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. परंतु, सरकारला त्याचं काहीही सोयरं सुतक नसल्याने हेमंतने ट्विटद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही हेमंतच्या रस्त्यांमधील खड्यांबाबतच्या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jLArCw