मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आणि यांच्या राजस्थानात होणाऱ्या राजेशाही विवाह सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच्या धार्मिक विधींना सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस कोर्ट बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये सुरुवात झाली आहे. या लग्नासाठी हॉटेल आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलं आहे. विकी आणि कतरिना यांचा लग्नसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यांच्यासाठी काय नियम आहेत, हे सांगणारी एक नोट त्यांना मिळाली आहे. ही नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गोड शब्दांत वऱ्हाडी मंडळींना दिली 'समज' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नोटमध्ये असे नमूद केले आहे की, 'अखेर तुम्ही येथे आलात... तुमचा जयपूर ते रणथंबोर प्रवासाचा आनंद तुम्ही घेतला असेल आणि तो सुखाचा झाला असेल अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही आरामात आणि निवांतपणे इथे रहा आणि पुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घ्या. आपल्या सर्वांनी विनंती आहे की, तुमचे मोबाईल रूममध्येच ठेवून या कार्यक्रमात सहभागी व्हा. सोशल मीडियावर या सोहळ्याचे कोणतेही फोटो, पोस्ट करणे टाळा. आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत.' दरम्यान, विकी आणि कतरिना यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या सिक्स सेंस फोर्ट बरवाडा हॉटेलमध्ये प्रारंभ झाला आहे. या लग्न सोहळ्यासाठी सहभागी होणारे पाहुणे मंडळी राजस्थानात दाखल होत आहे. या सोहळ्यासाठी नेहा धूपिया- अंगद बेदी, कबीर खान- मिनी माथुर हे देखील राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. विकी आणि कतरिना यांच्या लग्न सोहळ्याला फक्त १२० पाहुणे मंडळींनाच निमंत्रीत करण्यात आले आहे. कतरिनाच्या मेंदीचा कार्यक्रम मंगळवारी झाला आणि बुधवारी संगीत सोहळा होणार आहे. तर गुरुवारी, ९ डिसेंबर रोजी विकी आणि कतरिना यांचा विवाहसोहळा होणार आहे. त्यानंतर १० डिसेंबर रोजी रिसेप्शन होण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IuUS1l