नवी दिल्ली : तुम्ही जर १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये जास्त स्टोरेजसह येणारा फोन शोधत असाल तर मायक्रोमॅक्सकडे एक चांगला हँडसेट आहे. १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत या स्पेसिफिकेशन्ससह येणारा हा एकमेव फोन आहे. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: Micromax च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८९ टक्के, पीक ब्राइटनेस ४०० निट्स आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये यूनिसॉक टी६१० ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. कॅमेरा: फोनच्या बॅक पॅनेलवर दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि २ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Micromax In 2b मध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ८०२.११ एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ड्यूल VoWiFi, ब्लूटूथ व्हर्जन ५ आणि ड्यूल VoLTE सपोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट दिला आहे. In 2b ची किंमत फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. या स्टोरेज पर्यायासह १० हजारांच्या बजेटमध्ये येणारा हा एकमेव फोन आहे. या बजेटमधील अन्य पर्याय १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Poco C31 आणि Realme C21Y स्मार्टफोन येतो. Poco C31 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,४९९ रुपये, Realme C21Y स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. वाचा: I वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pB9KCy