Full Width(True/False)

PM मोदींच्या ताफ्यात नेहमी असते या फीचर्सची कार, सुरक्षेसाठी समजले जाते 'ब्रम्हास्त्र' !

नवी दिल्लीः राजकीय नेत्यांचा ताफा रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा पाहिला असेल. अशावेळी तुमच्या स्मार्टफोनचा सिग्नल गायब होतो. अनेकदा लोकांना वाटते की, काही तरी तांत्रिक बिघाड झाला असल्याने फोनचे सिग्नन गेले असेल. परंतु, असे नसते. ही बातमी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हे असे का होते. जाणून घ्या डिटेल्स. स्मार्टफोन बनू शकतो सुरक्षेसाठी धोका स्मार्टफोन फक्त कम्यूनिकेशनसाठी वापरला जातो. परंतु, हे सुरक्षेसाठी धोका सुद्धा समजला जाते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जावू शकतो. त्यामुळे सुरक्षा एजन्सी नेहमीच अलर्ट असते. ताफ्यातील लोकांनी आपल्या स्मार्टफोनचा वापर करू नये, यासाठी एका खास डिव्हाइसचा वापर केला जातो. ज्यावेळी रस्त्यावरून ताफा जात असतो. हे आहेत ते डिव्हाइस राजकीय नेत्यांच्या रॅलीवेळी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा एजन्सी अलर्ट असतात. यासाठी ते एका खास वाहनाचा वापर करीत असतात. एक एसयूव्ही (स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल) असते. या वाहनात स्मार्टफोन जॅमर्स खास पद्धतीने सेट केलेले असतात. हे जॅमर्स कोणत्याही टेलिकॉम सिग्नलला जाम करतात. एकदा कोणतीही व्यक्ती सिग्नलच्या रेंज मध्ये येत असल्यास त्याचा स्मार्टफोन काम करणे बंद करतो. त्यानंतर नेटवर्क पूर्ण पणे गायब होते. त्यानंतर स्मार्टफोनवरून कोणतेही कम्यूनिकेशन केले जावू शकत नाही. या राजकीय नेत्यांसाठी वापर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सारख्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या ताफ्यात याचा वापर केला जातो. ज्यात टेलिकॉम सिग्नल जॅमर्स लावले जातात. जे याच्या संपर्कात येतात त्याचे नेटवर्क आपोआप गायब होते. ज्यावेळी तेथून ताफा जात असतो त्यावेळी अचानक सिग्लन गायब होते. ताफा गेल्यानंतर सिग्नल पुन्हा येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GC6WMq