Full Width(True/False)

Reliance Jio: जिओने आणला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लान, किंमत फक्त १ रुपये; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे. या प्लानची किंमत फक्त १ रुपये आहे. या प्लानला खास अ‍ॅपवर लिस्ट करण्यात आले आहे. वेब सर्चवर हा प्लान दिसत नाही. जिओने १ रुपयाचा प्लान डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आणला आहे. वाचा: जिओचा १ रुपयांचा प्लान जिओच्या १ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १०० एमबी हाय स्पीड डेटा मिळतो. प्लानमध्ये १०० एमबी डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ६० kbps होईल. या प्लानमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्लानचा सिम सुरू ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जिओचा १ रुपयांचा रिचार्ज भारतातील सर्वात स्वस्त प्लान झाला आहे. एअरटेलशिवाय वोडाफोन आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून १ रुपयांचा रिचार्ज केला जातो. भारतात गरीब लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक रुपयांच्या प्लानमध्ये अनेकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकते. जिओकडे १ रुपयांसह १० आणि २० रुपयांच्या किंमतीचा टॉप-अप प्लान आहे. १० रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड वॅलिडिटीसह ७.४७ रुपये टॉक-टाइम मिळतो. तर २० रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड वॅलिडिटीसह १४.९५ रुपये टॉकटाइम मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oV6S4r