Full Width(True/False)

Smartphone Tips : स्मार्टफोन पाण्यात पडला तर, अजिबात करू नका 'हे' काम, होणार मोठे नुकसान, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चुकीने कधी स्मार्टफोन पाण्यात पडलाच तर अशा परिस्थितीत नेमके काय करावे हे अनेकांना कळात नाही. घाई गडबडीत चुकीचे उपाय केल्यामुळे स्मार्टफोन पूर्णपणे खराब होतो. स्मार्टफोनवर पाणी पडले तर तो लगेच खराब होतो असे अनेकांना वाटते. पण, असे अजिबात नाही. तुम्हाला हवे असल्यास, काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन पुन्हा कार्यरत स्थितीत आणू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही आणि स्मार्टफोन रिपेअरिंगसाठी घ्यावा लागणार नाही. वाचा: स्मार्टफोन चालू करू नका: जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तुम्ही तो पाण्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच तो चालू करण्याचा प्रयत्न करता. असे केल्याने फोन पूर्णपणे बंद होतो. फोन लगेच चालू करू नका. कारण, असे केल्यावर तुमचा स्मार्टफोन जवळ-जवळ पूर्णपणे खराब होईल टिश्यू पेपरने पुसून घ्या: तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तो पाण्यातून काढून टाकल्यानंतर सर्वप्रथम टिश्यू पेपरने तो पूर्णपणे स्वच्छ करा आणि जिथे पाण्याचे थेंब दिसतील तिथे स्वच्छ करा. यामुळे स्मार्टफोनमध्ये पाणी साचणार नाही याची खात्री होईल. हीटर वापरू नका: काही लोक स्मार्टफोन कोरडे करण्यासाठी हीटरसमोर ठेवतात, असे केल्याने स्मार्टफोनचे अधिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर सुकवण्याचा प्रयत्न करा. हिटरचा वापर करू नका. असे केल्यास तुमचा रिपेअरिंगचा खर्च आणखी वाढेल. तांदळात ठेवा:असे म्हणतात की ,तांदूळ पाणी काढून टाकतो, म्हणून जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तो तांदळाच्या भांड्यात ठेवा आणि त्यावर तांदूळ टाका. यानंतर दोन दिवसांनी, जेव्हा तुम्ही स्मार्टफोन चालू कराल. तेव्हा स्मार्टफोन सहज चालू होईल. यामागील कारण म्हणजे तांदूळ स्मार्टफोनमधील सर्व पाणी शोषून घेतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FfSERt