नवी दिल्ली : भारतात मेसेज पाठवण्यासाठी WhatsApp चा सर्वाधिक वापर केला जातो. या अॅपचा वापर करून लोक त्यांच्या माहितीची आणि खाजगी मेसेजेसची आपापसात देवाणघेवाण करतात. दरम्यान तुम्ही व्हॉट्सअॅपवर वर येणाऱ्या काही आक्षेपार्ह मेसेजेसची तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर काही दिवसांनीच त्या वर कारवाई केली जाते. तुम्हालाही आक्षेपार्ह मेसेजची तक्रार कशी करायची हे माहीत नसेल, तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. पाहा डिटेल्स. वाचा: एका मेसेजची तक्रार कशी करावी? यासाठी सर्व प्रथम ते चॅट उघडा आणि तुम्हाला रिपोर्ट करायचा तो मेसेज शोधा. आता तो मेसेज थोडा वेळ Hold And Press करा. तुम्हाला तीन डॉट्स दिसतील. आता या डॉटवर टॅप करा आणि रिपोर्ट पर्यायावर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला Confirmation साठी पुन्हा रिपोर्ट बटणावर क्लिक करावे लागेल. WhatsApp नंबरची तक्रार कशी करावी? प्रथम संपर्क क्रमांक शोधा ज्याची तक्रार करायची आहे. आता चॅट बॉक्समध्ये, वरच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर More बटणावर क्लिक करा आणि Report पर्यायावर क्लिक करून तुम्ही Report करू शकता. तुम्ही अशी तक्रार देखील करू शकता: तुम्हाला कोणत्याही आक्षेपार्ह मेसेजमुळे त्रास होत असेल, तर त्याबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्हाला त्या WhatsApp खात्याचा क्रमांक आणि मेसेजेसचा स्क्रीनशॉट ccaddn-dot@nic.in वर मेल करावा लागेल. त्यानंतर दूरसंचार विभाग या अपमानास्पद/आक्षेपार्ह/ जीवे मारण्याच्या धमक्या/अश्लील मेसेजची दखल घेईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xVj20g