नवी दिल्ली : इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक स्मार्टफोन यूजर्स व स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे. दरवर्षी सर्वाधिक गाणी आणि व्हिडिओ देखील भारतातच बनतात. म्यूझिक व्हिडिओच्या बाबतीत ही कंपनी पुढे असून, आता या कंपनीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. टी सीरिजच्या चॅनेलने २०० मिलियन म्हणजेच २० कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा पार केला आहे. असा रेकॉर्ड करणारा हा जगातील पहिलाच आहे. वाचा: T-Series युट्यूब चॅनेलशी संबंधित काही आकडे
  • T-Series च्या युट्यूब चॅनेलची सुरुवात १३ मार्च २००६ ला झाली. केवळ १५ वर्षात हा सर्वाधिक सबस्क्राइबर्स असणारा चॅनेल ठरला आहे.
  • टी सीरिज असा एकमेव चॅनेल आहे, ज्याचे भारतातील वेगवेगळ्या भाषेतील एकूण २९ रिजनल चॅनेल आहेत. याच्या एकूण सबस्क्राइबर्सची संख्या ३८.३ कोटी आहे. तर व्ह्यूज जवळपास ७१,८०० कोटी आहेत.
  • टी-सीरिज हा २० कोटी सबस्क्राइबर्स असणारा जगातील पहिला युट्यूब चॅनेल आहे. याच्या व्हिडिओला सरासरी ५०१.४३K व्ह्यूज मिळतात.
  • टी-सीरिजच्या प्रत्येक व्हिडिओला युट्यूबवर सरासरी १.६८ लाख वेळा पाहिले जाते. दर महिन्याला चॅनेलद्वारे जवळपास १० कोटी रुपयांची कमाई होते.
अशी वाढत गेली चॅनेलची सबस्क्राइबर संख्या
  • मे २०२१ - १४० मिलियन
  • ऑगस्ट २०२० - १५० मिलियन
  • नोव्हेंबर २०२० - १६० मिलियन
  • जानेवारी २०२१ - १७० मिलियन
  • एप्रिल २०२१ - १८० मिलियन
  • ऑगस्ट २०२१ - १९० मिलियन
  • डिसेंबर २०२१ - २०० मिलियन
सर्वाधिक सबस्क्राइबर्स असणारे टॉप-५ युट्यूब चॅनेल
  • T-series - २००M सबस्क्राइबर्स
  • Movies - १४४M सबस्क्राइबर्स
  • Cocomelon Nursery Rhymes - १२३M सबस्क्राइबर्स
  • SET India - १२१M सबस्क्राइबर्स
  • Music - ११५M सबस्क्राइबर्स
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ey5L00