Full Width(True/False)

Broadband Plans: BSNL ने लाँच केला धमाकेदार अनलिमिटेड प्लान, मिळेल २०००GB डेटा आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन प्लान्स लाँच करत आहे. यातच आता BSNL ने एक नवीन लाँच केला असून, हा प्लान ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लानची किंमत ९९९ रुपये आहे. हा सुपर स्टार प्रीमियम प्लस प्लान सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने सर्व नवीन ग्राहकांसाठी सध्याच्या ब्रॉडबँड प्लानची किंमत ९४९ रुपये आणि फायबर प्रीमियमची किंमत ९९९ रुपये केली आहे. वाचाः BSNL च्या ९९९ रुपयांच्या प्लानबद्दल सांगायचे तर यात २००० जीबीपर्यंत १५० एमबीपीएसने स्पीड मिळेल. त्यानंतर स्पीड १० एमबीपीएसपर्यंत कमी होईल. या प्लानध्ये यूजर्सला Disney+ Hotstar Premium चे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय प्लानमध्ये लायन्स गेट एलएलपी, शेमारू मी, शेमारू गुजराती, हंगामा म्यूझिक, हंगामा प्ले एसवीओडी, सोनी लिव्ह प्रीमियम, झी५ प्रीमियम, वूट सिलेक्टसह अन्य प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल. एअरटेलचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान एक्स्ट्रीम इंटरटेनमेंट ब्रॉडबँड प्लानमध्ये २०० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट मिळते. तसेच, कॉलिंग, झी५ प्रीमियम, एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्सचे सबस्क्रिप्शन आणि अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप मिळते. चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान या ब्रॉडबँड प्लानमध्ये १५० एमबीपीएस डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते. या प्लानमध्ये Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Zee5, Sony Liv, Voot Select सह १५ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JFCjrX