Full Width(True/False)

हा तर लोकशाहीवर हल्ला...मोदींच्या सुरक्षेवरून बॉलिवूड सेलिब्रिटी भडकले

मुंबई: पंजाबमधील फिरोजपूर इथं सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्यानं यांना बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडले. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर आता बॉलिवूड कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेते अनुपम खैर यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणं हे निंदनीय असल्याचं कंगनानं म्हटलं आहे. ' पंजाबमध्ये जे झालं ते लज्जास्पद आहे. पंतप्रधान हे देशातील नागरिकांनी निवडून दिलेले नेते आहेत. ते १४० कोटी जनतेचा आवाज आहेत. असं असताना त्यांच्यावर हल्ला म्हणजे प्रत्येक नागरिकावर हल्ला, लोकशाहीवर हल्ला. पंजाब आता दहशतवादी कारवायाचा अड्डा बनत आहे. हे थांबवलं नाही तर, देशासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. अनुपम खेर यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक पंजाब पोलिस आणि सरकारसाठी खेदजनक आहे. भाजपचे माजी खासदार आणि अभिनेता यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील घोडचूकीचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. हे सांगायची गरज नाही,पण ते यापुढं आणखी सक्षम होऊन उभे राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pZ9nmJ