नवी दिल्लीः भारतातील सर्वात विश्वासू कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने ५५ इंच आणि त्यावरच्या मोठ्या स्क्रीनची QLED आणि UHD रेंजच्या टेलिव्हीजनची मागणी पाहून पुन्हा एकदा टीव्ही फेस्टिव्हल ऑफर आणली आहे. ही ऑफर १ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सॅमसंगच्या रिटेल स्टोरवर उपलब्ध असतील. नवीन वर्षात त्या लोकासाठी खास ऑफर आहे. ज्यांना घरात मनोरंजनासाठी एका स्मार्ट टीव्ही सोबत एक साउंड बार खरेदी करायचा होता. तसेच त्याला कनेक्ट करण्यासाठी एक टॅबलेटची गरज आहे. यूजर्स आपल्या सध्याच्या टीव्हीपेक्षा जास्त मोठी स्क्रीनच्या टीव्ही सोबत अपग्रेड करण्याचा विचार असेल तर ते ५५ इंच आणि त्यापेक्षा जास्त मोठी नियो QLED 8K TVs, QLED TV आणि UHD TV खरेदीवर निश्चित ऑफर सोबत डीलचा लाभ घेऊ शकतात. एक आकर्षक ऑफर आणि कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर सोबत सॅमसंग Q सीरीज साउंडबार सॅमसंग QLED TV सोबत खास आहे. Q सीरीज साउंडबार डॉल्बी एटमॉस टेक्नोलॉजी सोबत येतो. याने घरात थिएटरसारखा अनुभव मिळतो. स्पेशल ऑफरची डिटेल्स >> या शानदार ऑफरमध्ये 85-इंच आणि 75-इंचाचे नियो QLED 8K TV च्या खरेदीवर 94,990 रुपये किंमतीच्या फ्री साउंडबारचा समावेश आहे. >> यूजर्सला 65-इंचाच्या नियो QLED 8K TV, 75-इंचाच्या UHD TV, 65-इंचाच्या आणि 55-इंचाचा नियो QLED TV आणि 65-इंच आणि 55-इंचाचे QLED TV टीव्हीच्या खरेदीवर गॅलेक्सी A7 LTE टॅब फ्री मिळणार आहे. याची किंमत 21,999 रुपये आहे. या सोबतच यूजर्संना २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि एक्सटेंडेड वॉरंटी ऑफरचा लाभ घेऊ शकतील. सॅमसंगच्या ५५ इंच आणि त्यावरच्या प्रीमियम रेंजच्या टीव्हीवर १९९० रुपये किंमत किंवा ईएमआय सुविधा उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/332c6mD