Full Width(True/False)

Prepaid Plans: BSNL चे सर्वात स्वस्त वर्षभर चालणारे प्लान्स, दरमहिना फक्त १२५ रुपये खर्च करून मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स

नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी खासगी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वीआयला टक्कर देण्यासाठी नवनवीन प्लान्स लाँच करत आहे. सोबतच, जुन्या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये देखील वाढ करत आहे. या प्लान्समध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा, कॉलिंग, एसएमएससह अनेक फायदे मिळतात. सोबतच, हे प्लान्स जास्त दिवसांच्या वैधतेसह देखील येतात. BSNL कडे असलेल्या अशाच वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: BSNL चा १,४९९ रुपयांचा प्लान तुम्ही जर जास्त वैधतेसह येणारा कमी किंमतीतील प्लान शोधत असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट प्लान आहे. कंपनीच्या १,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानचा महिन्याचा खर्च फक्त १२५ रुपये पडतो. BSNL चा २,३९९ रुपयांचा प्लान BSNL २,३९९ रुपयांच्या आपल्या प्रीपेड प्लानमध्ये ७५ दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. मात्र, सध्या ऑफर अंतर्गत ७५ दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. अशाप्रकारे एकूण ४४० दिवसांसह हा प्लान येतो. यात चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. BSNL चा १,९९९ रुपयांचा प्लान BSNL च्या १,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला एकूण ६०० जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ८० केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील मिळेल. या प्लानमध्ये Eros Now ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-1-year-recharge-plans-with-ott-benefits-check-details/articleshow/89171727.cms