Full Width(True/False)

Laptop Offers: २०,८९० रुपयांमध्ये घरी आणा Dell चा 'हा' जबरदस्त लॅपटॉप, लॅपटॉपमध्ये ८ GB RAM सह i3 प्रोसेसर, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: Flipkart इलेक्ट्रॉनिक्स सेल कालपासून म्हणजेच २७ जानेवारीपासून सुरू झाला असून तो ३१ जानेवारीपर्यंत लाईव्ह असेल. फ्लिपकार्ट सेल दरम्यान, ग्राहकांना लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात सूट देखील दिली जात आहे आणि अनेक मॉडेल्स अतिशय उत्तम ऑफरसह लिस्ट आहेत. ऑफर इतक्या छान आहेत की, सेल दरम्यान ग्राहकांना बंपर डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला सेलमध्‍ये मिळणार्‍या अशाच काही शानदार डीलबद्दल सांगत आहोत. वाचा: DELL Vostro 3401 ची वैशिष्ट्ये: या लॅपटॉपमध्ये १४-इंचाचा फुल-एचडी बॅकलिट अँटी-ग्लेअर डिस्प्ले आणि १० व्या पिढीचा इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे. सोबत ८ GB DDR4 रॅम देखील उपलब्ध असेल, एवढेच नाही तर या Dell लॅपटॉप मॉडेलमध्ये १ TB HDD स्टोरेज देखील उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 1 USB 2.0 पोर्ट, 2 USB 3.1 पोर्ट, HDMI 1.4 पोर्ट आणि SD कार्ड रीडर देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवरील सूचीनुसार, हे डेल होम 64 बिटवर काम करतो. लॅपटॉप मॉडेल ग्राहकांना १० तासांपर्यंत बॅटरीचे आयुष्य देखील देते. DELL Vostro 3401 लॅपटॉप मॉडेलची किंमत ३८,९९० रुपये असली तरी, जर तुम्ही तुमचा जुना लॅपटॉप दिला तर तुम्ही १८,१०० रुपयांपर्यंत मोठी बचत करू शकाल. तुम्हाला पूर्ण Exchange Value मिळाल्यास, या मॉडेलची किंमत २०,८९० रुपये इतकी होईल. DELL Vostro 3401: फ्लिपकार्ट ऑफर्स: Axis Bank क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट (१२५० रुपयांपर्यंत ), Citibank डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट (१५०० रुपयांपर्यंत ) आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी ६,४९९ रुपये प्रति महिना सुरू होणारा नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/gadget-news/computer/get-massive-discount-on-dell-laptop-in-flipkart-electronics-sale-read-details-see-offers/articleshow/89171664.cms