नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने गेल्यावर्षी ७ डिसेंबरला ९ पेक्षा अधिक असल्यास बंद केले जातील असे आदेश दिले होते. तसेच, यूजरला ९ पेक्षा जास्त सिमचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला होता. ही मुदत आज म्हणजेच २० जानेवारी २०२२ ला समाप्त होत आहे. यानंतर व्हेरिफिकेशन न केल्यास ९ पेक्षा जास्त नंबर असणाऱ्या यूजर्सचे सिम कार्ड बंद केले जाईल. या सिम कार्डवर इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंग बंद होईल. सिम कार्डचा हा नवीन नियम ७ डिसेंबर २०२१ पासून देशभरात लागू झाला आहे. वाचा: ने टेलिकॉम ऑपरेटर्सला आदेश दिले होते की, व्हेरिफिकेशन न केल्यास ९ पेक्षा जास्त सिम असणाऱ्या यूजरचे सिम कार्डचे ३० दिवसात आउटगोइंग कॉल आणि ४५ दिवसात इनकमिंग कॉल बंद केले जाईल. सोबतच, ६० दिवसात सिम कार्ड पूर्णपणे बंद केले जाईल. याशिवाय इंटरनॅशनल रोमिंग, आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. DoT नुसार, लॉ इन्फोर्समेंट एजन्सी, बँक अथवा इतर वित्तीय संस्थांकडून मोबाइल नंबरबाबत तक्रार आल्यास, अशा सिमची आउटगोइंग कॉलिंग ५ दिवस आणि इनकमिंग कॉलिंग १० दिवसात बंद केली जाईल. तसेच, १५ दिवसात सिम पूर्णपणे बंद केले जाईल. किती सिम ठेवण्याचा अधिकार? दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार, भारतातील कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावावर ९ सिम वापरू शकते. तर जम्मू-काश्मिर आणि ईशान्यकडील नागरिक ६ सिम वापरू शकतात. नियमांनुसार, एका ओळखपत्रावर ९ पेक्षा अधिक सिम अवैध असतील. ऑनलाइन फ्रॉड, आपत्तीजनक कॉल, घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tIxPuV