Full Width(True/False)

Smartwatch: व्हॉईस कॉलिंगसह Garmin Venu 2 Plus स्मार्टवॉच लाँच, वॉचमध्ये बॉडी बॅटरी एनर्जी मॉनिटरसह अनेक फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: वेअरेबल ब्रँड Garmin ने ग्राहकांसाठी नवीन स्मार्टवॉच सादर केली आहे. या वॉचच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या घड्याळात एक-दोन नाही तर व्हॉईस कॉलिंग फीचर, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट आणि बॉडी बॅटरी एनर्जी मॉनिटर, ग्राहकांना स्ट्रेस ट्रॅकिंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पाहा डिटेल्स. वाचा: Garmin Venu 2 Plus ची वैशिष्ट्ये: या स्मार्टवॉचमध्ये Always on display सपोर्टसह १.३ इंच AMOLED (४१६ x ४१६ पिक्सेल) स्क्रीन आहे. वॉच ४३ mm वॉचकेस आणि २० mm सिलिकॉन स्ट्रॅपसह येते. घड्याळ स्मार्टवॉच मोडमध्ये ९ दिवसांपर्यंत, GPS मोडमध्ये २४ तासांपर्यंत, संगीत मोडमध्ये GPS सह ८ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते. हे घड्याळ १० मिनिटांत स्मार्टवॉच मोडमध्ये १ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ प्रदान करते. घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉईस कॉलिंग वैशिष्ट्य. ज्याच्या मदतीने युजर्स घड्याळाद्वारे कॉल करू आणि रिसिव्ह करू शकतील. या घड्याळाला व्हॉईस असिस्टंट फंक्शन मिळेल. ज्याच्या मदतीने युजर्स मजकूरांना उत्तर देऊ शकतील तसेच घड्याळाद्वारे सुसंगत स्मार्ट होम उपकरणे नियंत्रित करू शकतील. पल्स Ox3 सेन्सर रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी काम करतो. याशिवाय, हे घड्याळ युजर्सच्या झोपण्याच्या पद्धतीवर नजर ठेवते आणि स्लीप स्कोअर देते. रेस्पिरेशन ट्रॅकिंग आणि महिलांसाठी वॉचमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. गार्मिन बॉडी बॅटरी एनर्जी मॉनिटरच्या साहाय्याने दिवसभरात शरीरात असलेली ऊर्जा मोजण्याचे काम देखील करते. Garmin Venu 2 Plus ची भारतात किंमत: कंपनीने या नवीन घड्याळाची किंमत ४६,९९० रुपये असून हे घड्याळ ग्रेफाइट ब्लॅक, क्रीम गोल्ड आणि पावडर ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही Amazon, Flipkart व्यतिरिक्त तुम्ही टाटा क्लिक आणि कंपनीच्या ब्रँड स्टोअरवरून हे घड्याळ खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tCyz4S