नवी दिल्ली: आणि Vivo V23 Pro 5G स्मार्टफोन्स Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल २०२२ मध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले असून फ्लिपकार्ट सेलचा आज शेवटचा दिवस आहे. Vivo V23 मालिकेतील दोन्ही स्मार्टफोन हे भारतातील पहिले स्मार्टफोन आहेत. ज्यात, ५० MP Dual Eye AF सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या ८ GB रॅम १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९० रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३४,९९० रुपयांना मिळेल. Vivo V23 5G स्मार्टफोनमध्ये ४ GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. वाचा: Vivo V23 5G : ऑफर एचडीएफसी कार्डसह Vivo V23 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर १० टक्के इन्स्टंट सूट दिली जात आहे. ICICI बँक कार्डवर फोन १० टक्के डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो. फोन खरेदी करण्याचा पर्याय ३,३३३ रुपये प्रति महिना EMI वर दिला जात असून Vivo V23 5G स्मार्टफोनवर १६,९५० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. Vivo V23 5G फोनमध्ये काय आहे खास? Vivo V23 5G स्मार्टफोनमध्ये ६.४ फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन ९०Hz आहे. स्क्रीन रिझोल्यूशन १०८० x२४०० पिक्सेल आहे. फोनमध्ये २.५ GHz octa-core MediaTek Dimensity 920 चिपसेट सपोर्ट करण्यात आला असून हा फोन Android 12 आधारित FunTouch OS वर काम करेल. Vivo V23 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. याशिवाय,८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल लेन्स देखील आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या मुख्य कॅमेऱ्याला ५० मेगापिक्सल लेन्स आणि दुसरा ८ मेगापिक्सेलचा लेन्स देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी ४२०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ४४ W फ्लॅश चार्ज चार्जरच्या मदतीने चार्ज करण्यास सक्षम असेल. Vivo V23 5G स्मार्टफोन ७ 5G बँडसह सादर करण्यात आला देखील फोन वाय-फाय हॉटस्पॉट, यूएसबी-सी चार्जिंग पोर्टसह येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GRIOWB