नवी दिल्ली : सॅमसंगने आपला लोकप्रिय स्मार्टफोन Galaxy A52s च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने भारतात ची किंमत ऑफलाइन स्टोर्समध्ये कंमी केली आहे. मात्र, अद्याप ऑनलाइन किंमतीत बदल केलेला नाही. वाचा: या हँडसेटला सप्टेंबरमध्ये स्टँडर्ड गॅलेक्सी ए५२ चे ऑफशूट म्हणून लाँच केले होते. फोन पंच-होल कटआउट, क्वाड रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. Samsung Galaxy A52s ची नवीन किंमत भारतात सॅमसंगच्या ऑफलाइन स्टोवर Galaxy A52s च्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपयांवरून ३०,९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत ३७,४९९ रुपयांवरून ३२,४९९ रुपये झाली आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत ५ हजार रुपयांनी कमी झाली आहे. Samsung Galaxy A52s चे फीचर आणि स्पेसिफिकेशन ड्यूल नॅनो सिम सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळतो. यात क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ७७८ जी चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी रियरला एलईडी फ्लॅशशह क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात रियरला ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, ५ मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि ५ मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर मिळतो. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rDIEM7