मुंबई- ७० च्या दशकात बॉलीवूडला डिस्को आणि रॉक संगीताची ओळख करून देणारे संगीतकार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. लहानपणापासूनच गाण्याची आवड असलेल्या बप्पी दा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यांची 'यार बिना चैन कहां रे' पासून ते 'ऊ ला ला' पर्यंत अशी अनेक गाणी अशी आहेत ज्याची भुरळ पडते. बप्पी दा यांचे संगीत क्षेत्रातील योगदान कोणीही कधीही विसरू शकत नाही. त्यांची गाणी केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संगीतप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय होती. आज बप्पी दांच्या आठवणीत त्यांची टॉप- २० गाणी ऐकू..


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/B4HtSdN