Full Width(True/False)

अवघ्या १० सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक झाला होता ‘हा’ फोन, आता भारतात करणार एंट्री; किंमत-फीचर्स लीक

नवी दिल्ली: ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आपले दोन नवीन iQOO 9 आणि Pro ला लाँच केले होते. चीनमधील लाँचिंगनंतर आता या फोन्सला लवकरच भारतात लाँच केले जाणार आहे. रिपोर्टनुसार, भारतात iQOO 9 series अंतर्गत तीन मॉडेल लाँच केले जातील. यामध्ये , iQOO 9 आणि iQOO 9 Pro चा समावेश आहे. यासोबतच, या फोन्सच्या फीचर्स आणि किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये झालेल्या फोनच्या पहिल्या सेलमध्ये iQOO 9 आणि iQOO 9 Pro या दोन्ही हँडसेट्सला ग्राहकांची जबरदस्त पसंती मिळाली होती. अवघ्या १० सेकंदात १०० मिलियन युआन (जवळपास ११६.२५ कोटी रुपये) किंमतीच्या फोन्सची विक्री झाली होती. वाचा: iQOO 9 ची संभाव्य किंमत किंमतीबद्दल सांगायचे तर रिपोर्टनुसार, iQOO 9 SE ची किंमत भारतात जवळपास ३५ हजार रुपये असेल. हे या सीरिजमधील बेस व्हेरिएंट असेल. याशिवाय या सीरिज अंतर्गत iQOO 9 आणि 9 Pro हे फोन्स देखील सादर केले जातील. iQOO 9 SE मध्ये क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ८८८ SoC चा सपोर्ट मिळेल. तर iQOO 9 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८८८+ चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. iQOO 9 SE मध्ये ६.६२ इंच FHD+ AMOLED पॅनेल मिळेल, तर iQOO 9 मध्ये ६.५६ इंच FHD+ AMOLED पॅनेल १०-बिट कलर डेप्थसह येईल. तर दुसरीकडे, iQOO 9 Pro मध्ये ६.७८ इंच QHD+ कर्व्ड E5 AMOLED डिस्प्ले दिला जाईल. हे तिन्ही स्मार्टफोन्स १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतील. iQOO 9 सीरिजमधील फोन्समध्ये मिळणाऱ्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर iQOO 9 Pro मध्ये ५० मेगापिक्सल सॅमसंग GN५ + ५० MP UW + १६ MP ट्रिपल कॅमरा सिस्टम असेल. प्रायमरी सेंसरमध्ये स्टेबलाइजेशन सपोर्ट दिला जाईल आणि टर्शियरी लेंसमध्ये २.५एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट मिळेल. तर iQOO 9 मध्ये जिम्बल स्टेबलाइजेशन सपोर्टसह ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. iQOO 9 SE च्या कॅमेऱ्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच, iQOO 9 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन ८ झेन १ SoC दिला जाईल. हे तिन्ही फोन अँड्राइड १२ आउट ऑफ द बॉक्सवर काम करतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AdGVyql