Full Width(True/False)

ओप्पो कंपनी आज भारतात Oppo Reno 7 Series लाँच करणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: नामांकित स्मार्टफोन Oppo कंपनी आज, म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी भारतात आपली नवीन सीरीज लाँच करणार आहे . या सीरीज अंतर्गत, OPPO Reno7 5G आणि OPPO Reno7 Pro 5G स्मार्टफोन लाँच केले जातील. याशिवाय, OPPO वॉच फ्री देखील लाँच करण्यात येईल. फोनबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अनेक खास फीचर्ससह ऑफर केला जाईल. यात ६५ W SuperVOOC चार्ज सपोर्ट आहे. जर तुम्ही या फोनच्या लाँचबद्दल उत्सुक असाल, तर येथे जाणून घ्या या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल. OPPO Reno7 5G आणि OPPO Reno7 Pro 5G स्मार्टफोन आणि OPPO वॉच फ्री ४ फेब्रुवारी २०२२ रोजी लाँच केले जातील. हा लाँच इव्हेंट दुपारी १२ वाजता होणार आहे. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकलाही भेट देऊ शकता.आणि , OPPO Reno7 5G आणि OPPO Reno7 Pro 5G चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. वाचा: OPPO Reno7 5G आणि OPPO Reno7 Pro 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये: Oppo Reno 7 5G मध्ये ८ GB RAM आणि ५ GB व्हर्च्युअल रॅम दिली जाऊ शकतात. तसेच, MediaTek Dimensity 900 SoC दिले जाऊ शकते. यात ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह ६४ मेगापिक्सेल ओम्निव्हिजन OV64B प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. Oppo Reno 7 5G च्या फ्रंटमध्ये ३२ -मेगापिक्सलचा Sony IMX615 सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात ६५ W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह ४५००० mAh बॅटरी देखील दिली जाईल. फोनमध्ये USB Type-C पोर्ट आणि ३.५ mm हेडफोन जॅक असेल. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. Oppo Reno 7 5G च्या ८ GB RAM + २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९० रुपये असेल. Oppo Reno 7 Pro 5G ची किंमत सिंगल १२ GB + २५६ GB मॉडेलसाठी ३९,९९० रुपये असेल. फोनची किंमत नक्की किती आणि तो युजर्सच्या बजेटमध्ये बसणार की नाही ते लाईनच नंतरच समोर येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9jQmUSZ