Full Width(True/False)

मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचे हॉट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई- बाॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा खुप सुंदर आहे. ती सध्या 'आई कुठे काय करते' या मराठी मालिकेचा रिमेक 'अनुपमा'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेत जसा तिचा बोल्ड अंदाजात दिसतो तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करते. मदालसाने तिच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोशूट शेअर केला, ज्याने फॅन्सच लक्षवेधून घेतलं आहे. बेडरूममधील हॉट फोटोशूट मदालसा शर्मा काही दिवसांपुर्वी एक फोटोशूट केला होता, ज्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाले. हे व्हायरल फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने बोल्डनेसच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या असल्याच पाहाया मिळत आहे. मदालसाने पांढऱ्या रंगाचा बाथरोब घालून बेडवर खूप हॉट पोझ दिल्या आहेच. या फोटोंमध्ये मदालसा खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटोशूट शेअर करत तिने एक छान कॅप्शन दिलं आहे. चाहते करत आहेत प्रेमाचा वर्षाव मदालसाने तिचा हा हॉट लूक पुर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे. तर केस कुरळे करून मोकळे सोडले आहेत. ति'च्या या फोटोंवरून नेटकऱ्यांची नजर हटत नाही, ते या लूकच कौतुक करताना थकत नाहीत. तिच्या या फोटोवर युजर्सही फटाफट लाइक्स करत आहेत. त्याचबरोबर प्रक्रियाही देताना दिसले आहेत. एका युझरने लिहिलं की, खुप प्रेम, दुसऱ्या युझरने लिहिलं हॉटी तर तिसरा युझर म्हणाला खुप सुंदर दिसत आहेस तू. मदालसाच्या या फोटोशूटला आतापर्यंत २१ हजाराहून अधीक लाइक्स मिळाले आहेत. दरम्यान मदालसाच्या कामाबाबत बोलायच झालं तर तिने अनेक मालिकांमघ्ये काम केलं आहे. परंतु 'अनुपमा' मालिकेमुळे मदालसाला खरी ओळख मिळाली. यात ती काव्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने या आपल्या नकारात्मक व्यक्तिरेखेमूळे प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/FUHlXRS