Full Width(True/False)

Video : राकेश आणि शमिता लवकरच करणार साखरपुडा?

मुंबई : बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी कार्यक्रमातील लव्हबर्ड आणि शुक्रवारी रात्री एकत्र फिरताना दिसले. त्या दोघांचे एकत्रित असे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे दोघेजण एका दागिन्यांच्या दुकानाबाहेर दिसले. त्यावेळी दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातले होते. शमिताने पांढ-या रंगाचा प्लाजो पँट आणि कोट घातला होता. तर राकशेने देखील पांढ-या रंगाचा शर्ट-पँट घातला होता. या दोघांना पाहून तिथे आलेल्या फोटोग्राफर्सना पाहून त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत फोटोंसाठी रोमँटिक पोझही दिल्या... राकेश बापट आणि शमिता शेट्टी एका ज्वेलरच्या दुकानाबाहेर दिसले. त्यामुळे हे दोघेजण व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी करत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर काहींच्या मते हे दोघेजण व्हॅलेंटाईनला साखरपुडा करण्याची शक्यता आहे. तर आणखी काही चाहत्यांनी व्हॅलेंटाईनच्या दिवशी राकेश शमिताला लग्नासाठी मागणी घालण्याची शक्यता असल्याचे म्हटले. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमिता शेट्टीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितले होते. तिने सांगितले होते की ते लवकरच लग्न करणार आहेत. शमिता आणि राकेशची भेट बिग बॉस ओटीटी कार्यक्रमात झाली. शमिताला अजूनही राकेशबद्दल जाणून घ्यायचे आहे. शमिताने जे काही सांगितले आहे, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दोघे एकमेकांना जाणून घेत असून लवकरच ते त्यांच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या प्रेमकथेला बिग बॉस ओटीटी कार्यक्रमातून सुरुवात झाली. राकेशने या कार्यक्रमात शमिताला प्रमोज केले. त्यानंतर हे दोघेजण सलमान खानच्या बिग बॉस १५ मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. परंतु राकेश बापटला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्याने कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर शमिता शेट्टीला या स्पर्धेत तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले..


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/SYXpClx