Full Width(True/False)

Video: 'लुका छुप्पी' गाताना लतादीदी झाल्या होत्या भावूक,वाचा या गाण्याचा कधीही न ऐकलेला किस्सा

मुंबई : भारतरत्न यांचे रविवार, ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक किस्से, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या रंग दे बसंती या सिनेमातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाआहे. या व्हिडिओमध्ये रेहमान यांनी संगीबद्ध केलेले 'लुका छुप्पी' हे गाणे लतादीदी गाताना दिसत आहेत. 'रंग दे बसंती' या सिनेमातील कथानक, त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहे. आजही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. याच सिनेमातील 'लुका छुप्पी' हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात... हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले असून याच गाण्‍याशी निगडीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. हे गाणे प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळचा आहे. या व्हिडिओमध्ये हे गाणे गाताना लतादीदी देखीलखूपच भावूक झालेल्या दिसत आहेत. गाण्याचे शब्द, त्याची चाल अतिशय मनाला भिडणारी असल्यामुळे ते गाताना लतादीदींच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले होते... डोळ्यांतून ओघणारे अश्रू पुसत पुसत त्यांनी हे गाणे गायले आहे... गाण्यासाठी तब्बल आठ तास उभ्या होत्या दीदी 'रंग दे बसंती' चित्रपटातील 'लुका छुप्पी' गाण्यासाठी लता मंगेशकर यांनीही खूप मेहनत घेतली होती. या गाण्यासाठी लतादीदींनी अनेक दिवस तालीम केली होती. इतकेच नाही तर जेव्हा हे गाणे रेकॉर्ड झाले होते, त्या दिवशीही लतादीदी तब्बल आठ तास उभ्या होत्या. या गोष्टीचा खुलासा रंग दे बसंती सिनेमाचे निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी एका मुलाखतीवेळी केला होता. त्यांनी सांगितले की, या गाण्याचे रेकॉर्डिंग १५ नोव्हेंबरला होणार होते. परंतु लता मंगेशकर ९-१० नोव्हेंबरला चेन्नईमध्ये दाखल झाल्या. मेहरा यांनी पुढे सांगितले की, आम्हाला वाटले की लतादीदींचे चेन्नईला आणखी काही काम असेल, त्यासाठी त्या आल्या असाव्यात. मात्र, नंतर कळले की त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी खूप आधीपासूनच आल्या होत्या. त्या दिवसापासून लता मंगेशकर रोज स्टुडिओत त्या गाण्याची तालीम करत होत्या. रेकॉर्डिंगच्या दिवशी तिथे लतादीदींसाठी पाणी, खाद्यपदार्थ आणि बसण्यासाठी खुर्ची ठेवली होती. परंतु त्यांनी काहीही घेतले नाही आणि सलग आठ तास उभे राहून त्या रिहर्सल करत होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/eqFPOkc