मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. शेन वॉर्न यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्न यांचं निधन थायलंड मधील Koh Samui येथे झाले. वॉर्न हे ज्या व्हिलामध्ये वास्तव्यास होते तिथे ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याआधीच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या पीआर मॅनेजमेंट कंपनीने दिली. शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील सोशल मीडियावरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. अभिनेता याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेन वॉर्न यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर रणवीरने हार्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला आहे. अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील ट्वीट करत शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली. उर्मिला यांनी लिहिले की, 'क्रिकेटमधील महान व्यक्तीमत्व शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा मोठा धक्का आहे. ते कायमस्वरुपी सगळ्यांच्या स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!' अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील शेन वॉर्न यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला. 'लेजंड कायम जिवंत राहतात' असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केला आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगची बायको गीता बसराने ट्वीट करत शेन वॉर्न यांना आदरांजली वाहिली. तिने लिहिले की, 'शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मोठा धक्का बसला आहे. अत्यंत दुःखद! शेन वॉर्न कायम एखाद्या राजासारखे राहिले. त्यांचा खेळ ही तसाच बहारदार होता. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना आहेत. भावपूर्ण आदरांजली' सिनेनिर्माता हंसल मेहता यांनी देखील ट्वीट करत शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की, 'अत्यंत धक्कादायक...' गायक अरमान मलिक याने देखील ट्विटरवरून शेन वॉर्न यांना आदरांजली वाहिली. त्याने लिहिले आहे की, 'शेन वॉर्न यांच्या अचानक निधनामुळे धक्का बसला आहे. फार लवकर गेले ते...' गुडघ्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतलेला अभिनेता रणदीप हुड्डाने देखील ट्वीट करत शेन वॉर्न यांना आदरांजली वाहिली. अशोक पंडित यांनी देखील ट्वीट करत शेन वॉर्न यांना आदरांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'ऑस्ट्रेलियाचा श्रेष्ठ फिरकीपटू शेन वॉर्न यांचं थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे ऐकून अत्यंत वाईट वाटले. क्रिकेट विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. शेन वॉर्न यांना श्रद्धांजली.' शेन वॉर्न यांच्या निधनानंतर त्यांना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये सयामी खेर,सनी देओल, विक्रांत मेस्सी,पुलकित सम्राट,राहुल बोस, बोमन ईराणी, अर्जुन कपूर, अभिनेता विवेक दहिया यांसारख्या अनेक कलाकारांनी शेन वॉर्न यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली. शेन वॉर्न यांनी क्रिकेट करिअरमध्ये १४५ कसोटी, १९४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले होते. १९९२ ते २००७ या काळात शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये १००१ बळी मिळवले होते. शेन वॉर्न यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाचंही नेतृत्व केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/CB0nUq9