नवी दिल्लीः व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या ५ प्रीपेड रिचार्जवर ५ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. कंपनीचे हे प्लान वेगवेगळ्या किंमतीत आणि वैधतेत येत आहे. व्होडाफोनच्या या प्लानमध्ये १४९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, ३९९ रुपये, आणि ५९९ रुपयांचा समावेश आहे. तसेच कंपनीच्या आणखी दोन ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या ऑलराऊंडर पॅक्सवर सुद्धा एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. वाचाः कोणत्या प्लानवर किती डेटा या ऑफर अंतर्गत २ जीबी डेटाचा प्लान १४९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेटा फ्री दिला जात आहे. या प्रमाणे २८ दिवसांच्या वैधतेत एकूण ३ जीबी डेटा युजर्संना वापरता येईल. दुसरा २१९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात रोज १ जीबी डेटा मिळत होता. आता या प्लानमध्ये २ जीबी डेटा अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्रमाणे २८ जीबी ऐवजी ग्राहकांना ३० जीबी डेटा मिळणार आहे. रोज १.५ जीबी डेटा देणाऱ्या २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या तीन प्लानमध्ये ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळत आहे. या तीनही प्लानमध्ये अनुक्रमे, २८ दिवस, ५६ दिवस, आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. हे सर्व प्लान अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. कंपनीने ही ऑफर App व Web Exclusive आहे. म्हणजेच रिचार्जसाठी तुम्हाला व्होडाफोन अॅप किंवा वेबसाईटचा वापर करावा लागेल. वाचाः ऑलराऊंडर पॅक्सवर ऑफर व्होडाफोन ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या ऑलराऊंडर पॅक्सवर सुद्धा ३०० एमबी डेटा फ्री दिला जात आहे. ४९ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता आणि ३८ रुपयांचा टॉकटाईम, १०० एमबी डेटा मिळत होता. तसेच ७९ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता ६४ रुपयांचा टॉकटाईम आणि २०० एमबी डेटा मिळत होता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CxbGaF