मुंबई: लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री हिनं सोशल मीडियात सातत्यानं चाहत्यांशी संपर्क ठेवला. योग असो, बागेत खत बनवणं असो वा अगदी सौंदर्यासाठीच्या टिप्स असोत, व्हिडीओंच्या माध्यमातून तिनं हा संवाद कायम ठेवला. पुण्यातून ती नुकतीच ती मुंबईला परतली. यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नासंदर्भातही एक खुलासा केलाय. काही महिन्यांपूर्वी परदेशवारीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्राजक्ताच्या लग्नाची चर्चासुरु होती. परंतु तिनं तेव्हा तिनं इतक्यात लग्नाचा विचार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता तिनं लग्नासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. 'तशी लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटणं अद्याप बाकी आहे',असं प्राजक्ता म्हणतेय.'लेकीच्या लग्नासाठी आईनं सोनं खरेदी वगैरे केव्हाच सुरू केली आहे. नवरा मुलगा मिळाला, की लग्न करेनच. मात्र, केव्हा हे माहीत नाही. निर्व्यसनी मुलगा असावा ही पहिली अपेक्षा आहे.'असं तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. प्राजक्ता नुकतीच मुंबईला परतली. लवकरच 'हास्यजत्रा' कार्यक्रमाचे नवे भाग रसिकांसमोर येणार आहेत. प्राजक्ता म्हणाली, 'नुकतंच काम सुरू झालं आहे. आधीही प्रोमो आणि डबिंगसाठी मी काम करत होतेच. लॉकडाउनमध्ये अनेकांनी आधीचे भाग पाहिले. मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी ते पाहून फोन केले. त्यामुळे नवे रसिक जोडले जातील याची खात्री आहे. मी केलाय त्या ट्रॅव्हल शोची संकल्पनाही भन्नाट आहे. मस्त महाराष्ट्र त्यात पाहायला मिळेल. दिग्दर्शकानं व्यक्त होण्याची सूट दिलेली, स्क्रिप्ट नव्हती त्यामुळे हा शो भन्नाट झालाय.' चित्रपट हे प्राधान्य लॉकडाउनमध्ये प्राजक्तानं स्वतःचं यु-ट्यूब चॅनेल सुरू केलं. सोशल मीडियाबाबत अनेक गोष्टी ती शिकली. आगामी काळात चित्रपट हे प्राधान्य असेल, असं ती सांगते. ती म्हणाली, 'हास्यजत्रेत दिसत राहेन. ट्रॅव्हल शो आहेच. दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. त्यानंतर संधी पाहून निर्णय घेणार आहे. मला पहिल्यापासूनच घोळक्यात राहायला आवडत नाही. कुठल्याही गोष्टीत म्होरक्या असणं हे माझ्या आवडीचं आहे.' तसंच 'वेब सीरिजसाठी विचारणा झाली; पण अनावश्यक बोल्ड सीनमुळे त्यात दिसले नाही', असं सांगून प्राजक्ता म्हणते, 'बोल्ड दृश्यांमुळेच मी आतापर्यंत वेब सीरिजमध्ये दिसले नाही. बोल्डनेस कथेची गरज असेल, तर ठीक आहे. उगाच त्यामुळे प्रेक्षक वाढतील असं लॉजिक लावलं जात असेल, तर ते कळणं अवघड आहे. ओटीटीवर ट्रॅव्हल शो येईलच; पण अभिनयही करायचा आहे. संधी केव्हा मिळते पाहूयात.' असं प्राजक्ता म्हणतेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZTZys8