मुंबई : उत्तर प्रदेशच्या अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत एक पोलीस कर्मचारी प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना कॅमेऱ्यात कैद झालाय. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका होत आहे. अनेक अभिनेत्रींनी देखील या गैरवर्तणूक प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केलाय. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं देखील पोलिसांच्या या वर्तणुकीवर तीव्र आक्षेप घेतलाय. हेमांगी कवी हिची ही सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.या फोटोमध्ये एक पोलीस अधिकारी प्रियंका गांधी यांचा हात पकडताना दिसत आहे. 'नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम, बाहेर पड, म्हणाऱ्यांनो आणि चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा!आहे का सुरक्षीत! कसे वाटतायेत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे.मूळ समस्या कुठेय कळतंय का?', असा प्रश्न विचारत तिनं संताप व्यक्त केलाय. काय आहे प्रकरण? हाथरसला रवाना होत असताना डीएनडीवर गोळा झालेले काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यावेळी प्रियांका गांधी पुढे जात होत्या. त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांऐवजी पुरूष पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात पुरूष पोलिस अधिकारी प्रियांका गांधी यांची कुर्ता हाताने मजबुतीने पकडून त्यांना रोखून धरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. घडलेल्या या प्रकाराची समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या नोएडा पोलिसांनी माफीनामा जारी केला. नोएडा पोलिसांनी एक ट्विट केले आहे. नोएडा पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत खेद आहे. ही घटना मोठ्या गर्दीला नियंत्रण करत असताना घडलेली आहे. आम्ही प्रियांका गांधी यांच्याकडे खेद व्यक्त करत आहोत. चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत प्रियांका गांधींसोबत गैरवर्तनाप्रकरणी भाजप नेत्या आणि महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं ट्विट देखील चर्चेत आहे.'एका महिला नेत्याच्या कपड्यांवर टाकण्याची पुरुष पोलिसाची हिंमत झालीच कशी! समर्थनात जर महिला पुढे येत असताील तर कोणत्याही ठिकाणचे पोलीस असोत त्यांना आपल्या मर्यादेचं भान असायला हवं. भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी अशा पोलिसांवर कठोर कारवाई करा' असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33ueOif